शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स! आठवी नापास बनला तोतया सीबीआय अधिकारी,चारजणांना कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 20:04 IST

तोतया सीबीआय अधिकाऱ्यासह चार आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

पैठण (औरंगाबाद): पैठण येथील सोनाराच्या पेढीवर तोतया सीबीआय अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या आरोपीसह इतर तीन जणांना पैठण न्यायालयाने  दि. ६ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. विशेष म्हणजे, तोतया सीबीआय अधिकारी बनून आलेला विठ्ठल हारगुडे आठवी नापास असल्याचे समोर आले आहे.विठ्ठल हारगुडेने  सीबीआय अधिकारी बनण्याचे केलेले सोंग त्याच्या शिक्षणानेच उघडे पाडले आणि तो सहज पोलीसांच्या तावडीत गावला.

विठ्ठल हारगुडेने, धनंजय गाठे ( पुणे), रघुनाथ ईच्छैय्या, मुत्तू गरूट, विनोद पोटफाडे (पैठण) यांनी संगनमत करून पैठण येथील माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांच्या सोनेचांदीच्या पेढीवर सीबीआय अधिकारी बनून रविवारी छापा टाकला. यावेळी लोळगे यांना तब्बल पाच कोटी रूपयांची मागणी केली होती. परंतु, सुरज लोळगे यांनी प्रसंगावधान राखत पैठण पोलीसांना बोलावून आरोपींचे मनसुबे उधळून लावले होते. या प्रकरणी चारही आरोपींना रविवारी अटक करण्यात आली होती. 

या प्रकरणाला स्थानिक राजकारणाची किनार असल्याने सोमवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक सतीष भोसले यांनी बंदोबस्तात आरोपीस पैठण न्यायालयात हजर केले. पोलीसांनी आरोपीच्या पीसीआरची मागणी केली न्यायालयाने चारही आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

ओळखपत्र क्राईम ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशनचेआठवी नापास असलेल्या विठ्ठल हारगुडेचा  शिक्षणानेच घात केला. सीबीआयचा लोगो वापरून तयार केलेल्या त्याच्या ओळखपत्रावर सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन असे नाव नव्हते तर चक्क क्राईम ब्युरो ऑफ इनव्हेस्टीगेशन असे लिहलेले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, निरीक्षक किशोर पवार यांनी ओळपत्रावर नजर फिरवताच तो तोतया असल्याचे ओळखले आणि त्याचे अवतार कार्य संपले. आरोपी विठ्ठल हारगुडेने आणखी कोठे कोठे अशा प्रकारे छापे मारून गुन्हे केले आहेत का या बाबत पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद