शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या दाढीकडे एवढे पैसे कुठून आले'; एकनाथ शिंदेंची ईडी चौकशी करण्याची चंद्रकांत खैरेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 12:45 IST

शिवसेनेतील बंडखोर आमदारांची ईडीने चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे

औरंगाबाद: शिवसेनेतील बंडखोर आमदारांना कोट्यवधी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. आता ईडीने यातही लक्ष घालावे. त्या दाढीकडे (एकनाथ शिंदे) एवढे पैसे कुठून आले, याची देखील ईडीने चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. पश्चिम व मध्य मतदारसंघातील बंडखोर आ.संजय शिरसाट, आ.प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातील निषेध मेळाव्यात ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. शिंदे यांनी सेनेतील ४० आमदार सोबत असून हा आकडा ५० पर्यंत जाईल असा दावा केला आहे. यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडी सरकार संकटात आल्याचे दिसत असले तरी आता शिवसेना पक्षच संकटात सापडला आहे. बंडखोर आमदारांनी वेगळा गट निर्माण करण्याची तयारी केली आहे. यासाठी विधानसभा अध्यक्षांना शिंदे यांनी पत्र देण्यात आले. या बंडखोरांमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार आहेत. जिल्ह्यातील आमदारांना मोठ्या प्रमाणात विकास निधी, गिफ्ट्स आणि पैसे देऊन शिंदेनी आपलेसे केल्याचा आरोप सेनेतून करण्यात येतोय. 

दरम्यान, बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेनेने निषेध मेळावे घेणे सुरु केले आहे. सोमवारी औरंगाबाद मध्य आणि पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचा निषेध मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात नेते चंद्रकांत खैरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत गेलेले आमदार शिरसाट आणि जैस्वाल यांच्यावर हल्लाबोल केला. ३८३ कोटी रुपयांच्या बीड बायपासच्या रस्त्यात सात कोटी रुपये आ. शिरसाट यांनी घेतल्याचे कंत्राटदाराकडून समजले आहे. जैस्वालांनी पैसे घेऊन गद्दारी केली, असा आरोप खैरे यांनी केला. तसेच एकनाथ शिंदेंकडे एवढे पैसे कुठून आले याची ईडीने चौकशी करावी अशी मागणी देखील खैरे यांनी यावेळी केली.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदेChandrakant Khaireचंद्रकांत खैरेShiv SenaशिवसेनाMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ