शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेला माझा तो ‘शहाणा’ महाराष्ट्र ? मधु मंगेश कर्णिक यांचा खडा सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 16:42 IST

महाराष्ट्राची संवेदनशीलता संपलीय का? 

ठळक मुद्दे महाराष्ट्र ‘वेडा’ होता कामा नये, अशी आग्रही भूमिका कर्णिक यांनी मांडली.नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

औरंगाबाद : शंभर वर्षांची वैचारिक व शहाणपणाची परंपरा असलेला हा महाराष्ट्र.... मराठवाड्याने तर रत्नासारखी माणसे दिली.अनेक साधू-संत दिले; पण आज हा शहाणपणा व विवेकवाद उरलाय का? कु ठे गेला तो माझा ‘शहाणा’ महाराष्ट्र ? असा खडा सवाल आज येथे प्रख्यात साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी विचारला. व त्याचवेळी महाराष्ट्र ‘वेडा’ होता कामा नये, अशी आग्रही भूमिका मांडली. मसापचा जीवन गौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना देताना ते बोलत होते. मसापच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मधुकरअण्णा मुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.

नरेंद्र चपळगावकर विचारांची दिशा देतात. न्यायबुद्धी तर त्यांच्याकडे आहेच. त्यांचं लेखन शहाणपण देऊन जाते. गेल्या १०-१५ वर्षांपासून ते जे  लिहिताहेत ते फार मोलाचं आहे. हे समाजाचं मोठं धन होय. मोठं वैभव होय,या पुरस्कारामागे मसापचं निर्मळ मन त्यांच्यामागे आहे. रक्कम किती, शाली किती याला महत्त्व नाही, असे गौरवोद्गार कर्णिक यांनी काढले. कर्णिक म्हणाले, आज पाच-सहा रुपये देऊन विकत घेतलेल्या वर्तमानपत्रात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार अशा बातम्या वाचल्यानंतर मन विषण्ण होतं. मी कुठल्या पक्षाचा नाही. एक संवेदनशील नागरिक आहे; पण राजकारणानं विवेकवाद संपवलाय. रस्त्यानं चालणाऱ्या दाभोलकरांना सहज मारलं जातं. महाराष्ट्राची संवेदनशीलता संपलीय का? 

नरेंद्र चपळगावकर मातृसंस्था मसापतर्फे हा सत्कार होतोय. मसापच्या उभारणीत राबलेल्या, निरपेक्षपणे कष्ट घेतलेल्या त्या साऱ्यांचा हा सत्कार आहे, असे मी मानतो. मसापच्या शाखांची स्थापना करणाऱ्या शिक्षकांचं आज स्मरण होतंय. मराठीच्या प्रसारासाठी मायबोली पथकाची स्थापना करणाऱ्या तुळजापूरच्या क.भ. प्रयागसारख्या कार्यकर्त्याच्या निरलस प्रेमातून साहित्य परिषद उभी राहत असते, असे सांगत नरेंद्र चपळगावकर यांनी सत्काराला उत्तर दिले. न.शे.पोहनेरकर, तु.शं. कुलकर्णी, सुधीर रसाळ, अनंत भालेराव, रा.रं. बोराडे, बाबा भांड,  कौतिकराव ठाले आदींचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. मसापच्या कामाचा, मैत्रीचा व प्रेमाचा आनंद दिला, असे चपळगावकर यांनी कृतज्ञतेने नमूद केले. 

ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत प्रा. डॉ. ऋषिकेश काबंळे यांनी नरेंद्र चपळगावकर: व्यक्ती, लेखन व कर्तृत्व यावर सविस्तर भाष्य केले. चपळगावकर यांनी आपले १८ ग्रंथ कुणाला अर्पण केले, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. ग्रंथ कुणाला अर्पण केले, हे फार महत्त्वाचे असते असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितोद्धारक या कोंदणात दलितही ठेवू इच्छितात आणि दलितेतरही. ही भूमिका चपळगावकर यांना मान्य नाही. चपळगावकर यांचं ललित लेखनही विचारलोलुप दृष्टी देणारे आहे, असे डॉ. कांबळे म्हणाले. प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर रंिसका देशमुख यांनी मानपत्राचे वाचन केले. डॉ. कैलास इंगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर के. एस. अतकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास कविवर्य फ. मुं. शिंदे, प्राचार्य प्रतापराव बोराडे, रा. रं. बोराडे, डॉ. सुधीर रसाळ, बाबा भांड यांच्यासह मोठ्या संख्येने रसिक-श्रोत्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिक