मंत्र्यांची फौज गेली कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:31 IST2017-10-06T00:31:36+5:302017-10-06T00:31:36+5:30

महापालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या मागे हत्तीचे बळ उभे करू, प्रत्येक प्रभागात एक मंत्री देऊ अशी घोषणा करणाºया भाजपाच्या मंत्र्यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरवली असल्याने भाजपा उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून ऐन लढाईच्या काळात उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे़

Where did the army of the ministers go? | मंत्र्यांची फौज गेली कुठे?

मंत्र्यांची फौज गेली कुठे?

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या मागे हत्तीचे बळ उभे करू, प्रत्येक प्रभागात एक मंत्री देऊ अशी घोषणा करणाºया भाजपाच्या मंत्र्यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरवली असल्याने भाजपा उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून ऐन लढाईच्या काळात उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे़
नांदेड महापालिकेत सत्ता परिवर्तनाचे स्वप्न पाहणाºया भाजपाने निवडणुकीच्या तयारीदरम्यान मोठ्या घोषणा केल्या आहेत़ याच घोषणाबाजीला भुललेल्यांनी उमेदवारीही पदरात पाडून घेतली़ भाजपा उमेदवारांच्या बैठकीत महापालिका प्रभारींनी उमेदवारांनी कामाला लागण्याचे आदेश देताना पक्षाकडून त्यांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले होते़ भाजपाचे २० मंत्री प्रत्येक प्रभागात ४ आॅक्टोबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत ठाण मांडून राहतील असेही सांगितले होते़ मात्र ५ आॅक्टोबर उलटला तरी भाजपा मंत्री नांदेडकडे फिरकत नसल्याचे दिसत आहे़ नांदेडमधील राजकीय परिस्थितीचा जणू या मंत्र्यांना अंदाज आला असावा अशीच परिस्थिती आज तरी आहे़
परिणामी भाजपाकडून रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे़ भाजपाचे प्रभारी, शिवसेनेचे आयात नेते यांनाच घेऊन प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे़ त्यामुळे भाजपाच्या प्रचारामध्ये तोच तो पणा येत असल्याचे खुद्द उमेदवारच सांगत आहेत़ प्रचाराचे सुक्ष्म नियोजन केले जात असल्याचे भाजपाकडून सांगितले जात असले तरी भाजपाच्या पदाधिकाºयांनी भाजपा उमेदवारांपुढे केलेल्या घोषणाच हवेत विरत आहेत़ त्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनांची किती पूर्तता होईल याबाबतही साशंकता व्यक्त होत आहे़ मतदानापूर्वीचे ४ ते ५ दिवस हे प्रचारासाठी महत्वाचे असले तरी भाजपाकडून मात्र केवळ प्रचार कार्यालयाचे उद्घाटनेच सुरू आहेत़
नांदेड महापालिकेत अनुभवी व तगडा प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेसशी सामना करताना भाजपाचे अनेक नवखे उमेदवार उसन्या अवसानावर रणांगणात आहेत़ भाजपाने फिफ्टी वन प्लसची घोषणा केली असली तरी प्रचाराची अशीच परिस्थिती राहिली तर शेवटच्या दोन दिवसात भाजपाचे उमेदवार दिसेनासेच होतील़ प्रचारात भाजपाच्या दोन्ही प्रभारींची दमछाक होत असताना इतर मंत्र्यांनी नांदेडकडे पाठ फिरवली आहे़
दरम्यान, भाजपाच्या या परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर खुद्द प्रदेशाध्यक्ष खा़ रावसाहेब दानवे हे गुरूवारी रात्री उशिरा नांदेडमध्ये दाखल होणार असून, ते रात्री उशिरापर्यंत निवडणूक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडून नव्याने रणनीती ठरवण्याची अपेक्षा आहे़

Web Title: Where did the army of the ministers go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.