आदिवासी समाजाच्या योजना जातात कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:12 IST2017-09-17T00:12:50+5:302017-09-17T00:12:50+5:30
आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़

आदिवासी समाजाच्या योजना जातात कुठे ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आदिवासींसाठी राबविलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत़ मग त्या योजना जातात कुठे, असा सवाल करीत आदिवासींच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी अन् शासनाची आहे, असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले़
आदिवासी मन्नेरवारलू समाजाचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन नांदेडात पार पडले़ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ मंचावर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री अर्जुन खोतकर, आ़हेमंत पाटील, आ़सुभाष साबणे, आ़प्रताप पाटील चिखलीकर, मुक्तेश्वर धोंडगे, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा, भाजप महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, मिलिंद देशमुख, सेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम, बाळासाहेब देशमुख, सतीश पिंलगवाड, बी़ डी़ वाघमारे, नरसिंगराव जेठेवाड, चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रा़अनंत राऊत, ज्योतीबा खराटे, श्यामसुंदर शिंदे, नागनाथ घिसेवाड, संतोष वारकड, दिगंबर टिपरसे आदींची उपस्थिती होती़
यावेळी पालकमंत्री खोतकर म्हणाले, आचारसंहिता संपल्यानंतर आदिवासी मन्नेरवारलू समाजाच्या विविध प्रश्नांवर मुंबईत बैठक बोलवू़ दरम्यान, नागनाथ घिसेवाड यांनी आदिवासी समाजातील अधिकाºयांनी वेगवेगळ्या जमातीला दूर करण्याचे काम केले असून त्यांनी मन्नेरवारलूला यादीतून हद्दपार करण्याचे काम केले़ त्यामुळे आदिवासी विकास विभाग व आदिवासींशी संबंधित कार्यालयात गैरआदिवासी अधिकाºयांची नियुक्ती करावी़ आ़ सुभाष साबणे म्हणाले, अनेक अधिकाºयांना निलंबित करण्याचे आश्वासन देऊनसुद्धा त्यांना सरकार निलंबित करीत नाही़ येणाºया नागपूर अधिवेशनात हा विषय लावून धरला जाईल़, असे आश्वासन दिले़ आ़ हेमंत पाटील म्हणाले, वाघाची जमातच वाघाला ओळखते.़ वाघ हा जंगलात असतो आणि आदिवासी बांधवदेखील जंगलात राहतात़ त्यामुळे त्यांचे प्रश्न शिवसेनेचा वाघच सोडवेल़ उद्योजक अमितकुमार कंठेवाड यांचा जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला़ तसेच शिवाजीराव बोधगिरी, लक्ष्मण पोशट्टी यांनाही सन्मानित करण्यात आले़ प्रास्ताविक आयोजक प्रवीण जेठेवाड तर सूत्रसंचालन व्यंकटेश चौधरी यांनी केले़