शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे अन् विमानसेवा महत्त्वाची कधी वाटणार?

By संतोष हिरेमठ | Updated: April 25, 2024 17:17 IST

पीपल्स मॅनिफेस्टो: किती वर्षे कागदावरच विकास? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, जिल्हावासीयांचा प्रवास खडतरच

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ‘महाराष्ट्राची पर्यटन राजधानी’ आहे. ही राजधानी कोणाच्या मेहेरबानीवर नव्हे तर या जिल्ह्याला निसर्गदत्त पर्यटनाचे लेणे लाभल्यामुळे झाली आहे. ‘पर्यटन जिल्हा’ अशी बिरूदावलीही मिळालेली आहे. रस्ते, बससेवा, रेल्वे, विमानसेवा या दळणवळण आणि वाहतूक सुविधा परिपूर्ण असल्यावर कोणत्याही जिल्ह्याचा विकास सर्वच पातळीवर फास्ट ट्रॅकवर येतो. मात्र, वर्षानुवर्षे कागदावर अन् चर्चेतच राहणाऱ्या प्रकल्पांची स्थिती पाहता जिल्ह्याच्या विकासासाठी रस्ते, रेल्वे, विमानसेवा सरकारला महत्त्वाच्या वाटत नसल्याची ओरड जनतेतून होत आहे.

जिल्ह्यातील वाहतूक क्षेत्रासाठी अनेक नव्या गोष्टींची घोषणा करण्यात आली. मात्र, काही गोष्टी झाल्या, तर काही गोष्टी अर्धवट राहिल्या, तर काही अनेक वर्षांपासून कागदावरच. त्यामुळे वाहतूक क्षेत्राच्या विकासाला खीळ बसली आहे. रेल्वे विकासाच्या बाबतीत गेल्या दोन तीन वर्षात विद्युतीकरण, पीटलाइनचा प्रश्न मार्गी लागला. रेल्वे स्टेशनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाणार आहे. परंतु रेल्वेचा विकास झाला असे नाही. अद्यापही नव्या रेल्वेंपासून अनेक प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न प्रवाशांना भेडसावत आहे. अशीच काहीशी स्थिती विमानसेवा, रस्ते मार्गांबाबत आहे.

रेल्वे विकासासाठी हे गरजेचे...- अंकई (मनमाड) ते छत्रपती संभाजीनगर या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरण गतीने पूर्ण करण्याची गरज.- छत्रपती संभाजीनगर-परभणी दुहेरीकरणासाठी निधी खेचून आणावा.- रोटेगाव- पुणतांबा हा २७ कि. मी.चा प्रस्तावित कागदावरच.- छत्रपती संभाजीनगर - दौलताबाद-कन्नड-चाळीसगाव हा लोहमार्ग मार्गी लागणे.- औद्योगिक दृष्टीने आवश्यक असलेल्या छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर या नवीन मार्गासाठी प्राधान्याने लक्ष घालून या मार्गाचे काम सुरू करून घ्यावे.- छत्रपती संभाजीगरच्या पीटलाइनचा २४ बोगींसाठी विस्तार व दक्षिणेकडील मालधक्का हलवून त्याजागी नवीन प्लॅटफाॅर्म करणे गरजेचे.- छत्रपती संभाजीनगरहून देशाच्या महत्त्वाच्या शहरांसाठी थेट रेल्वे सुरू करणे गरजेचे.- छत्रपती संभाजीनगर-बीड-धाराशिव मार्गाला मान्यता मिळवून द्यावी.

राजकीय नेत्यांनी कधी बसस्थानक पाहिले का? पर्यटन राजधानी असलेल्या सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ ऑगस्ट २०१९ रोजी भूमिपूजन झाले. परंतु, अद्यापही हे काम सुरू झालेले नाही. मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झालेली आहे. राजकीय नेत्यांनी कधी हे बसस्थानक जाऊन पाहिले का, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होतो.

इतर जिल्ह्यात उपप्रादेशिक परिवहन कार्यालये, इथे का नाही? राज्यातील लातूर, जळगाव याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्यातून ग्रामीण भागातील वाहनधारकांना थेट छत्रपती संभाजीनगरच गाठावे लागते.

विमानसेवा वाढीसाठी हे आवश्यक- शहराचा ‘उडान’ योजनेमध्ये समावेश.- विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करणे.-विमानाच्या इंधनवरील व्हॅट एक टक्का केल्यास विमानसेवा वाढीस हातभार लागेल.- एअर बेस, विमानांसह हेलिकाॅप्टर सेवा.- आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणे.- देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्गोसेवा. -औद्योगिक, पर्यटन शहरे, बुद्धिस्ट सर्किटला हवाई ‘कनेक्टिव्हिटी’. 

घोषणा, पण पुढे काय? शेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रोची घोषणा झाली. यासह औट्रम बोगदा, छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा विद्यमान रस्ता एक्स्प्रेस-वेमध्ये करणे यासह रस्ते मार्गाचा विकास जिल्ह्यासाठी गरजेचे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी रस्ते मार्गाच्या विकासाला ‘स्पीड’ मिळत नसल्याची परिस्थिती आहे.

प्रकल्पासाठी लक्ष देणे आवश्यकछत्रपती संभाजीनगरमध्ये येऊ घातलेले नवीन प्रकल्प आणि सर्वांगीण विकासासाठी येणाऱ्या नवीन खासदारांनी शहर व जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी लक्ष देणे आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगरची पीटलाइन सुरू झाल्यावर छत्रपती संभाजीनगर-मनमाड-दौंड-सोलापूर-विजापूर- गदग-हुबळी अशी एक्स्प्रेस सुरू करता येईल. कमी वेळात लांबचा फेरा न घेता चौदा-सोळा तासांत हुबळी गाठता येईल.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४