छत्रपतीनगर ते मयूरपार्क रस्ता कधी होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:05 IST2021-05-07T04:05:01+5:302021-05-07T04:05:01+5:30
सध्या मयूर पार्क भागातील शिवेश्वर कॉलनीतील ६० फुटाच्या रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. छत्रपती नगर ते मयूर पार्क ...

छत्रपतीनगर ते मयूरपार्क रस्ता कधी होणार?
सध्या मयूर पार्क भागातील शिवेश्वर कॉलनीतील ६० फुटाच्या रस्त्याचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. छत्रपती नगर ते मयूर पार्क या रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठ्या नागरी वसाहती स्थापन झालेल्या आहेत. परंतु नागरी सुविधांची मात्र प्रकर्षाने येथे वाणवा जाणवते. पावसाळ्यात तर नागरिक व वाहनधारक दगड, चिखल, खड्डे यामधून मार्गक्रमण करीत असतात. पाण्याचे टँकर चालक व ऑटो रिक्षा चालकही या भागात यायला तयार नसतात. त्यामुळे या रस्त्याचा वनवास कधी संपणार ? असा सवाल भन्ते विश्वजीत, भन्ते धम्मबोधी, योगेश्वर निकम, मुकेश निकम, विजय वाडेकर, सुनील वाडेकर, गोविंद देशमुख, दिगंबर काटकर, साहेबराव पाटील या नागरिकांनी उपस्थित केला आहे. या रस्त्याच्या बाजूने पाईपलाईनचे नियोजन करून नागरिकांची चिखल व खाच खळग्यातून कायमस्वरूपी मुक्तता करण्याची नागरिकांची मागणी आहे.