पालेभाज्या आल्या आवाक्यात, टोमॅटोचे भाव उतरेना
By Admin | Updated: July 25, 2016 00:34 IST2016-07-25T00:14:40+5:302016-07-25T00:34:28+5:30
जालना : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडल्याने पीक परिस्थिती तसेच भाजीपाला उत्पादन चांगले होत आहे. मात्र पालेभाज्यांचे भाव आवाक्यात आले असले तरी फळभाज्यांचे भाव कडाडलेलेच आहेत.

पालेभाज्या आल्या आवाक्यात, टोमॅटोचे भाव उतरेना
अंमलबजावणी दूरच : हेल्मेटविनाच मिळत आहे सर्वत्र पेट्रोल
सालेकसा : अपघातांत दुचाकीस्वाराच्या जीवाचे रक्षण व्हावे म्हणून दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचे केले आहे. मात्र कोणीही हेल्मेटचा वापर करीत नाही. सर्वांना हेल्मेटची सवय लागावी यासाठी आता हेल्मेट असल्याशिवाय पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळणार नाही, अशी भूमिका घेत राज्य शासनाने परिपत्रक जारी केले. परंतू त्याची माहिती वाहनधारकांना तर दूर, पेट्रोल पंपाच्या संचालकांनाच नाही. त्यामुळे तालुक्यात कुठेच या सक्तीची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
वाहन चालकांना तसेच मागे बसलेल्या व्यक्तींनी हेल्मेट घालून दुचाकीवर बसावे म्हणून शासनाने हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, असे परिपत्रक जारी केले. त्या अनुषंगाने कोणत्याही पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या दुचाकी चालकाने हेल्मेट घातलेले दिसणे अपेक्षित आहे, तरच दुचाकीत पेट्रोल टाकण्यात यावे, असे आदेश सर्व तेल कंपन्या, पेट्रोल पंप संचालक तसेच संबंधित सर्व विभागांना देण्यात आले. परंतु रविवारी (दि.२४ जुलैला पेट्रोल पंपावर निरिक्षण केले असता कुठेही याची अमलबजावणी झालेली दिसून आलेली नाही.
सालेकसा तालुक्यात दोन पेट्रोल पंप असून या दोन्ही पेट्रोल पंपावर नेहमीसारखीच परिस्थीती दिसून आली. हेल्मेटविना दुचाकीवाले येत गेले आणि पेट्रोल पंपवाले त्यांना पेट्रोल देत गेले. (तालुका प्रतिनिधी)
सक्तीबद्दल जनजागृतीची गरज
शासनाने हेल्मेट सक्ती करण्यासाठी हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही, असे परिपत्रक निर्गमीत केले. परंतु या परिपत्रकापासून व निर्णयापासून सामान्य नागरिक अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येत आहे. या आधी अनेक वेळा हेल्मेटसक्ती केल्यानंतर राजकीय किंवा गैरराजकीय दबावापोटी हेल्मेट सक्ती मागे घेण्यात आली. त्यामुळे अशा निर्णयांना सामान्य जनता किंवा दुचाकी मालक गांभिर्याने घेत नाही.