बांधकाम चालू असतानाच सार्वजनिक शौचालयाचे कोसळले छत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:44 IST2017-09-17T00:44:09+5:302017-09-17T00:44:09+5:30

बांधकाम सभापती तौफिक पटेल यांच्या प्रभाग ८ मध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच छत कोसळले. यामध्ये दोघे बालंबाल बचावले.

When the building was going on, the roof of the public toilets collapsed | बांधकाम चालू असतानाच सार्वजनिक शौचालयाचे कोसळले छत

बांधकाम चालू असतानाच सार्वजनिक शौचालयाचे कोसळले छत

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : नगर पालिकेच्या वतीेने सार्वजनिक शौचालयाचे काम सुरु आहे. त्यातच बांधकाम सभापती तौफिक पटेल यांच्या प्रभाग ८ मध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू असतानाच छत कोसळले. यामध्ये दोघे बालंबाल बचावले. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
शौचालयाचे दिलेले टार्गेट पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बांधकाम सभापती तौफिक पटेल यांच्या प्रभाग ८ मधील शासकिय गोदामाजवळ सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरुआहे. हे काम निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी होत्या, परंतु मुख्याधिकाºयांनी हे काम खुद्द बांधकाम सभापती करीत असल्याने या कामाकडे कानाडोळा केला. हेच दुर्लक्ष शनिवारी दुपारी निकृष्ट कामाचे दर्शन घडवून गेले. हे काम निकृष्ट झाल्याचा आरोप एमआयएमचे युवक शहराध्यक्ष रौफ लाला यांनी केला. त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड म्हणाले, सदरील काम हे बांधकाम सभापती करीत असल्यामुळे या बाबत मला काही बोलता येणार नाही.

Web Title: When the building was going on, the roof of the public toilets collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.