शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
4
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
5
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
6
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
7
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
8
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
9
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
10
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
11
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
12
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
13
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
14
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
15
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
16
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
17
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
18
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
19
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
20
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला

रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशले; औरंगाबादेतील अभियंत्याचा रेल्वेतून प्रदूषणमुक्त वीजनिर्मिती दावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 15:56 IST

कोट्यवधींचा इंधन व विजेवर होणारा खर्च टाळण्याचे यशस्वी संशोधन केल्याचा दावा औरंगाबादेतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने केला.

ठळक मुद्दे रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशमान झाले पाणी, डिझेल, कोळसा जाळण्याची गरज नाही

- साहेबराव हिवराळे 

औरंगाबाद : कोट्यवधींचा इंधन व विजेवर होणारा खर्च टाळण्याचे यशस्वी संशोधन केल्याचा दावा औरंगाबादेतील एका मेकॅनिकल इंजिनिअरने केला. रेल्वेचे देशभर पसरलेले जाळे अन् रेल्वे रुळांवर धावताना त्यातून निर्माण झालेली वीज महावितरणला देण्याची ही त्याची कल्पना आहे.

मेकॅनिकल इंजिनिअर विजेंद्र रोजेकर व त्यांचा मित्र संजय मुथियान हे १० वर्षांपासून यावर प्रयोग करीत आहेत. या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार डिझेल, कोळसा, पाणी, तसेच विकत घेण्यात येणारी वीज, असा एकूण अब्जावधी रुपयांचा खर्च यातून वाचविणे शक्य आहे.  रेल्वेने आता सोलार सिस्टीम पॅनल बसवून, तसेच रेल्वे प्लॅटफार्मवर प्रवाशांच्या येण्या-जाण्यामुळे वीजनिर्मितीचा प्रयोग सुरू करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेमार्गात असलेल्या भुयाराच्या तोंडावर पवन चक्की बसवून हवेच्या दाबातून पवनऊर्जा देऊ शकते, किती रेल्वे येणार आणि जाणार तेवढीच वीज मिळेल. सूर्यप्रकाशामुळे सौरऊर्जा तयार होईल; परंतु एक रेल्वे दिवसभरातून किमान २० तास धावत राहणार. त्यातून विशिष्ट पद्धतीने तयार झालेली वीज रेल्वेच्या स्वयंचालण्यासाठी अधिक फायद्याची ठरणार, तसेच उर्वरित वीज रेल्वे वीज केंद्राला परत देऊ शकते. 

लोडशेडिंगची झंझट दूर होणाररेल्वेच्या प्रत्येक डब्यातून वीज तयार होऊन त्यातून रेल्वे इंजिनला पुरवून ती प्रवाहित तारांच्या माध्यमातून परत वीज केंद्रात जमा होऊ शकते. खेड्यात तसेच निवासी वसाहतीत लोडशेडिंगची झंझटच यातून निकाली निघण्याची संकल्पना मुथियान व रोजेकर यांनी मांडली.

रेल्वेची चाके फिरली अन् दिवे प्रकाशमान झालेएमआयडीसी वाळूज येथे एका शेडवर दोघांनी आपली कल्पनाशक्ती वापरून मागील ८ ते १० वर्षांपासून विविध प्रकारची साधने वापरून वीजनिर्मितीचा प्रयोग केला. रेल्वेच्या प्रतिकृतीचे इंजिन, तसेच बोगी (डबा) तयार केला. त्याची रुळावर प्रायोगिकतत्त्वावर चाचणी घेतली. बॅटरी किंवा फ्युएलवर ही रेल्वे स्टार्ट केली की, काही क्षणांत जनरेटरच्या मदतीने वीजनिर्मिती होते. गतीनुसार तिच्या आकडेवारीचे टिपणदेखील पॅनल बोर्डवर दाखवले जाते. हे तंत्रज्ञान रेल्वे व वीज मंडळाने स्वीकारल्यास महसुलाची मोठी बचत होऊन त्याचा फायदाही होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.

टॅग्स :electricityवीजrailwayरेल्वेscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद