शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

शेतात ‘सर्जा-राजा’च्या जागी ट्रॅक्टरची चाके गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 2:16 AM

६४५ ट्रॅक्टरची नोंदणी; कृषी ट्रॅक्टरला मागणी

- संतोष हिरेमठ औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. त्यामुळे शेतात आता ‘सर्जा- राजा’च्या जागी ट्रॅक्टरची चाके वेगाने फिरत आहेत. जून आणि जुलै या अवघ्या दोनच महिन्यांत तब्बल ६४५ कृषी ट्रॅक्टरची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाली आहे.बळीराजा आता परंपरागत शेतीप्द्धतीा फाटा देत आहे. मठा प्रमाणावर शेतीचे झपाट्याने यांत्रिकीकरण सुरू असून, पूर्वमशागत, पेरणी, आंतरमशागत आणि मळणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. कमी कालावधीत काम उरकण्यासाठी ट्रॅक्टरची मागणी वाढत आहे.शिवाय बदलत्या काळात ग्रामीण भागात शेतीत काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी होत आहे. याचा ताण शेतीतील कामावर पडतो. अनेक कामासाठी मानवी श्रम अपुरे पडतात. त्यामुळे शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर किती सोयीचा होऊ शकतो, याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.नांगरणीसह शेतीची अनेक कामे ट्रॅक्टरचा वापर करून काही कालावधीतच पूर्ण करणे शक्य होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढत असल्याचे दिसून येत आहे.भीतीचे वातावरण असल्याने यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे एप्रिल ते मे महिन्यादरम्यान एकाही ट्रॅक्टरची आरटीओ कार्यालयात नोंद झाली नाही; परंतु जून महिन्यापासून ट्रॅक्टरच्या विक्रीला सुरुवात झाली.जुलैअखेर तब्बल ६४५ कृषी ट्रॅक्टरची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाली. गतवर्षी याच ४ महिन्यांत ७४८ कृषी ट्रॅक्टरची नोंद झाली होती.त्यात यंदा किंचित घट झाली असली तरी कोरोनाच्या प्रादुर्भावातही ट्रॅक्टरची विक्री होत असल्याचे दिसते. त्यातही कमर्शियल ट्रॅक्टरपेक्षा कृषी ट्रॅक्टरचीच विक्री सर्वाधिक होत आहे. एप्रिल ते जुलैदरम्यान यंदा केवळ ३ कमर्शियल ट्रॅक्टरची नोंद झाली.एक ट्रॅक्टर, कामे अनेकस्वत:च्या शेतात वापर करण्यासह इतरांच्या शेतीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून देऊन उत्पन्न मिळविण्यास प्राधान्य दिले जात आहे. वर्षभर इतर कामे करून उत्पन्न मिळविण्यावर भर दिला जात आहे.जिल्ह्यातील ट्रॅक्टरची परिस्थितीएप्रिल ते जुलै २०२० - ६४५एप्रिल ते जुलै २०१९ - ७४८जिल्ह्यातील एकूण संख्या - ३१ हजार ४६१