शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

हा आवाज कशाचा...? शक्तीशाली गुढ आवाजाने पैठण परिसर हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 19:06 IST

दोन वर्षानंतर सोमवारी पुन्हा गुढ आवाजाचा दणका

पैठण ( औरंगाबाद ) : दोन वर्षानंतर  शक्तीशाली गुढ आवाजाने आज पुन्हा एकदा पैठण शहर व परीसर हादरला. २४ फेब्रुवारी, २०२० रोजी पैठण परिसराला गुढ आवाजाचा दणका बसला होता. गेल्या सात वर्षातील गुढ आवाजाचा आजचा ३० वा हादरा होता. विशेष म्हणजे, यापूर्वी पैठण शहराला फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यानच असे हादरे बसले आहेत. यंदा मात्र जानेवारीत हादरा बसला आहे. भूकंप मापन यंत्रावर नोंद होत नसलेल्या या गुढ आवाजा समोर जिओलॉजिकल सर्वे ऑफ ईंडियानेही हात टेकले आहेत.  नेमका हा आवाज येतो कोठून हा  यक्ष प्रश्न मात्र जनतेला भेडसावत आहे. 

आज दुपारी १.५३ वा   शक्तिशाली गूढ आवाजाने पैठण शहर व परिसर हादरला. पैठण शहराच्या १० किलोमीटर परिघात या गुढ आवाजाची तीव्रता जाणवली. आवाजाच्या तीव्रतेने नागरिकांमध्ये थोडावेळ चलबिचल झाली होती. पैठण शहरास व परिसरातील अनेक गावांना अशा आवाजाचे हादरे ठराविक कालावधीनंतर सातत्याने बसत आहेत.मात्र प्रशासनाकडून या आवाजाबाबत खुलासा होत नसल्याने जनतेत आवाजाबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. आवाजाची तीव्रता जास्त असल्याने  अनेक नागरिकांच्या घराच्या भिंती हादरल्या, छताचे पत्रे थरथरले, खिडकिच्या काचा कंप  पावल्या, मातीच्या घराच्या भिंतीची माती घसरली, या प्रकाराने  नागरिकांची भितीने गाळण उडाली असे आखतवाडा येथील दादासाहेब म्हस्के, पैठण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन लोहिया,  बाजार समितीचे संचालक राजू टेकाळे, संजू कोरडे, मयुर वैद्य आदींनी सांगितले.  

सात वर्षात ३० गुढ  आवाजाचे दणके...... पैठण परिसरात अशा प्रकारच्या गूढ आवाजाचे नियमीत पणे  हादरे बसत आहेत प्रत्येक वेळी जनतेत घबराट पसरते,  या गुढ आवाजाची शहनिशा करून हा आवाज नेमका कशाचा आहे या बाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी जनतेतून मागणीही सातत्याने होत आहे. गेल्या ७ वर्षात आजचा ३० वा गुढ आवाज होता. दरम्यान गूढ आवाजाचा हादरा व तीव्रतेत सातत्याने वाढ  होत असल्याने जनतेत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पैठण परिसरात जायकवाडी सारखे मोठे १०२टी एम सी क्षमतेचे धरण असल्याने शंकाकुशंकेने नागरिकांची झोप उडाली आहे.  वारंवार असे धक्के बसत असताना जिल्हा प्रशासन मात्र या बाबतीत मौन बाळगून आहे. प्रशासनाकडून कसलाच खुलासा होत नसल्याने या आवाजाचे गूढ वाढतच चालले आहे.  

शास्त्रज्ञांना सुध्दा गुढ  आवाजाचे रहस्य उलगडले नाहीपैठण शहर व तालुक्यात सातत्याने  भुगर्भात होत असलेल्या गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी नागपूर येथील भारतीय भूगर्भ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे  पथक  पैठण येथे दि १२ ऑगस्ट २०१५ रोजी   दाखल झाले होते. वरिष्ठ भुगर्भशास्त्रज्ञ महेश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली  या पथकाने गुढ आवाजाचे संशोधन करण्यासाठी माती खडक आदीचे नमुने नेले होते. तथापी पैठण शहर व परिसरात सातत्याने होणाऱ्या गूढ आवाजाचे रहस्य शोधताना  जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, नागपूर चे भूगर्भशास्त्रज्ञ ठोस निष्कर्ष काढू शकले नाहीत. परंतू या शास्त्रज्ञांनी पैठण व नागपूर येथील भूकंप मापन यंत्राच्या नोंदीचा हवाला देत या आवाजाचा व भुगर्भीय हालचालीचा काही एक संबंध नसल्याचे ठामपणे जायकवाडी प्रशासनास दिलेल्या अहवालात मांडले आहे. विशेष म्हणजे, या अहवालात आवाजाच्या घटना घडल्या आहेत हे शास्त्रज्ञांनी मान्य केले असल्याने शेवटी हा आवाज नेमका येतो कोठून या प्रश्नाचे उत्तर अद्यापही अनुत्तरितच राहिले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण