शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

औरंगाबादला काय मिळणार खास ? केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचे ट्विट व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 16:15 IST

Dr.Bhagwat Karad: मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या ट्विटने सोशल मीडियात शहरासाठी आता नवीन काय घोषणा होणार याची चर्चा रंगली आहे.

औरंगाबाद : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr.Bhagwat Karad) यांनी आज केलेले एक ट्विट शहरात प्रचंड व्हायरल झाले आहे.'लवकरच ऐतिहासिक शहरासाठी ऐतिहासिक निर्णयाची घोषणा' असे ट्विट मंत्री डॉ. कराड यांनी केले आहे. यात त्यांनी ऐतिहासिक देवगिरी किल्ला दाखवला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. यामुळे मंत्री कराड आता शहरासाठी कोणती नवी घोषणा करण्यात येणार याची उत्सुकता औरंगाबादकरांना लागली आहे. 

मंत्री डॉ. भागवत कराड यांच्या ट्विटने सोशल मीडियात आता शहरासाठी नवीन काय घोषणा होणार याची चर्चा रंगली आहे. कोणी शहराच्या नामकरणाबद्दल तर कोणी विमानतळ विस्ताराबद्दल अंदाज बांधला आहे. भागवत कराड यांची मंत्री पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी शहराच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेला मिळणारा निधी, पाणी प्रश्न, विमान-रेल्वे सेवेत वाढ, मेट्रो प्रोजेक्ट, वाहतूक प्रश्न यात त्यांनी मुख्तः काम सुरु केल्याचे दिसत आहे. तसेच स्मार्ट सिटीमधून बरेच प्रोजेक्ट सुरु आहेत. यामुळे आता शहराच्या विकासात भर टाकणारा आणखी एखादा प्रोजेक्ट येणार की शहर नामांतरावर काही घोषणा होणार याची उत्सुकता शहरवासियांना आहे.

मेट्रोसाठीच्या निधीची होऊ शकते घोषणा ?शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याने केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी थेट वाळूज ते शेंद्रा असा एकच उड्डाणपूल असावा यासाठी पुढाकार घेतला आहे. यासोबत शहरात मेट्रो प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न सुरु आहेत. मंगळवारीच वाळूज ते शेंद्रा डीएमआयसी मेट्रो डबल डेकर उड्डाणपुलावरून होणार असून त्याचा डीपीआर तयार करण्यासाठी महामेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना स्मार्ट सिटी लवकरच वर्क ऑर्डर देणार आहे. हा आराखडा तयार झाल्यानंतर निधीबाबत चर्चा करण्यासाठी डॉ. कराड, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी, राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भेटी घेणार आहेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाBhagwat Karadडॉ. भागवतNarendra Modiनरेंद्र मोदी