शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काय हा घोळ ? ‘आरटीओ’त सुटीच्या दिवशी कामावर फिरवतात शेवटचा ‘हात’

By संतोष हिरेमठ | Updated: August 21, 2023 20:20 IST

‘आरटीओ’त रविवारी चालते काही कर्मचाऱ्यांकडून कामकाज

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात चक्क सुट्टीच्या दिवशी, रविवारी वाहनांसंबंधी विविध कामकाज करण्याचा ‘उद्योग’ सुरु असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसला. कार्यालयाचे दार उघडून काही कर्मचाऱ्यांकडून वाहनांच्या कागदपत्रांवर शेवटचा ‘हात’ फिरविला जात आहे.

आरटीओ कार्यालयात सुट्टीच्या दिवशी काही कर्मचाऱ्यांकडून कामकाज केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात ‘लोकमत’ने रविवारी थेट आरटीओ कार्यालय गाठून पडताळणी केली. तेव्हा अंधार पडलेल्या कार्यालयात कक्षासमोर कर्मचारी कागदपत्रांची हाताळणी करताना दिसून आला. तसेच नव्या रूपातील वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक) आणि वाहन परवाना (लायसन्स) देण्याचे कंत्राट कर्नाटकातील एका कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीला आरटीओ कार्यालयात लर्निंग लायसन्स चाचणी कक्षाच्या परिसरात जागा देण्यात आली. या ठिकाणीही कर्मचारी दिसले.

सुट्टीच्या दिवशीचे कर्तव्य नाही, मंग का?सुट्टीच्या दिवशी कोणत्याही कर्मचाऱ्याला ड्युटी लावली जात नाही. यासंदर्भात विचारणा केल्यानंतर शिल्लक राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी, कामाचा भार कमी करण्यासाठी सुट्टीच्या दिवशी काम करीत असल्याचे सांगण्यात आले.

वीज गेलेली, इतर कर्मचारी आले नाहीआऱटीओ कार्यालयात सुट्टीच्या दिवशीही काही जणांकडून काम केले जाते. रविवारी आरटीओ कार्यालयात वीजपुरवठा खंडित झालेला होता. याची माहिती सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांना मिळालेली होती. त्यामुळे त्यांनी कार्यालयात येण्याचे टाळले. यावरून संगणकीय कामकाजही सुट्टीच्या दिवशी केली जात असल्याचे दिसले.

कर्मचाऱ्याला विचारलेले प्रश्नप्रतिनिधी : तुम्हाला सुट्टीच्या दिवशी ड्युटी लावली आहे का?कर्मचारी : नाही,प्रतिनिधी : मग सुट्टीच्या दिवशी कसे?कर्मचारी : दर शनिवारी, रविवारी येत असतो. काम करतो. सोमवारी सर पेपरवर सह्या करतात.प्रतिनिधी : इतर कोण कोण कर्मचारी येतात?कर्मचारी : ज्यांचे काम आहे, ते येत असतात.

कर्मचारी स्वत:हून येतातपेंडिंग कामासाठी विशेषत: नाॅन ट्रान्सपोर्टच्या कामासाठी काही कर्मचारी स्वत:हून शनिवारी, रविवारी कार्यालयात काम करतात. जुने आरसी पेंडिंगच्या कामासाठी, वाहनाच्या नव्या सिरीजसंदर्भातील काही कर्मचारीही येतात. याविषयी कल्पना आहे.-विजय काठोळे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRto officeआरटीओ ऑफीस