शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आई-बाबा होण्याचे योग्य वय कोणते? शिक्षण, करिअरमुळे लग्न उशिरा करणाऱ्यांची संख्या वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 15:34 IST

पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मुलगी असो की मुलगा, आधी लग्नाचा विचार केला जात असे.

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : शिक्षण आणि करिअरमुळे लग्न उशिरा करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढली आहे. त्यामुळे आपोआप पहिले मूल होऊ देण्याचे वयदेखील वाढले आहे. त्यातूनच अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे योग्य वयात आई-बाबा होणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण होताच मुलगी असो की मुलगा, आधी लग्नाचा विचार केला जात असे. परंतु सध्या शिक्षण घेतानाच वय २१ वर्षे उलटतात. त्यानंतर करिअरचा विचार केला जातो. त्यामुळे २५ वर्षानंतर लग्नाचा विचार सुरू केला जातो.

आई होण्याचे योग्य वय कोणते?तज्ज्ञांच्या मते आई होण्याचे २१ ते ३० वर्षे हे योग्य वय ठरते. या वयादरम्यान पहिले मूल होणे अधिक सुरक्षित असते. वयाच्या ३५ व्या वर्षी दुसरे मूल झाले तरी वैद्यकीय दृष्ट्या क्वचित एखादी समस्या उद्भवते. परंतु वयाच्या ३५ वर्षांनंतर पहिले मूल होऊ देणे हे काहीचे चिंतादायक ठरू शकते.

बाबा होण्याचे योग्य वय कोणते?मूल जन्माला घालण्यासाठी पुरुषाचे योग्य वय कोणते याचे उत्तर अनेक घटकांवर अवलंबून आहे. पुरुषांमध्ये फर्टीलिटी प्रभावित करणारा मुख्य घटक आहे टेस्टोस्टेरोनचा स्तर. ३५ वर्षाच्या आत बाबा होणे हे योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

वय वाढले तर...वय वाढल्यानंतर मधुमेह, हायपरटेन्शन यासह इतर आजारांना महिला, पुरुषांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वय वाढले तर आई-बाबा होण्यासाठी अडचणी येतात. मग अनेक दाम्पत्ये डाॅक्टरांकडे धाव घेतात. गरोदरपणात होणाऱ्या मधुमेहाला जेस्टेशनल डायबिटीज असे म्हणतात. ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया जेव्हा आई होऊ पाहतात, तेव्हा त्यांच्या शरीरात ही समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.

माता, शिशूची सुरक्षिततालग्नाचे वय वाढले आहे. परंतु उशिरा मूल होण्याचा आईबरोबर शिशूलाही धोका होऊ शकतो. त्यामुळे २१ ते ३० वर्षे या वयात पहिले मूल होणे योग्य असते. म्हणजे या वयात आई होणे अधिक सुरक्षित असते.- डाॅ. सोनाली देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग विभाग, घाटी

संगोपनासाठी महत्त्वाचेयोग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे. त्याबरोबरच बालकांच्या संगोपनाच्या दृष्टीने योग्य वयात आई-बाबा होणेही गरजेचे आहे. २१ ते ३० वर्षे या वयात आई होणे अधिक योग्य ठरते.- डाॅ. कमलाकर मुदखेडकर, जिल्हा रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFamilyपरिवार