शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

पाणीवापरावर निर्बंध, तलावातील पाणी राखीव ठेवणे म्हणजे काय?

By बापू सोळुंके | Updated: September 8, 2023 20:04 IST

या वर्षीसारख्या दुष्काळसदृश अपवादात्मक परिस्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वीही पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातो.

छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प आणि रिमझिम पावसामुळे मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. धरणे तळ गाठू लागल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर तहसीलदार उपलब्ध जलसाठ्यातील पाणीवापरावर निर्बंध टाकून पाणी राखीव ठेवत आहेत.

पाणी राखीव ठेवणे म्हणजे काय?कोणत्याही लहान-मोठ्या धरणात १५ ऑक्टोबर रोजी धरणात उपलब्ध पाणीसाठा किती आहे आणि वर्षभर पिण्यासाठी किती पाण्याची आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील आणि जिल्हाधिकारी यांचा समावेश असलेली समिती घेत असते. या वर्षीसारख्या दुष्काळसदृश अपवादात्मक परिस्थितीत १५ ऑक्टोबरपूर्वीही पाणीवापरावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जातो. हा निर्णय गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना कळविला जातो. यानंतर कार्यकारी संचालक त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना धरणातील पाणी राखीव ठेवण्याचे निर्देश देतात.

धरण परिसराचा वीजपुरवठा खंडित केला जातोदुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास अवैध आणि चोरट्या मार्गाने पाणीउपसा करण्याचा प्रकार वाढतो. अशा वेळी अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी, तहसीलदार आणि महावितरण कंपनीचे अधिकारी संयुक्तपणे कारवाई करून धरणक्षेत्रातील वीजपुरवठा खंडित करतात. बऱ्याचदा पाणी उपसा करणारे मोटारपंप जप्त केले जातात.

चोरट्या मार्गाने कोणी पाणी उपसा करू नयेपाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन उपशावर निर्बंध आणते. हे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरावे, यास प्राधान्य दिले जाते. अशा वेळी चोरट्या मार्गाने कोणी पाणी उपसा करू नये, यासाठी धरण परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जातो. बऱ्याचदा विद्युत मोटारपंप जप्त करण्यात येतात.- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, कडा.

जायकवाडीत ३३ टक्के, तर मध्यम प्रकल्पात १७ टक्के जलसाठाधरणाचे नाव --- पाणीसाठा (टक्क्यांत)जायकवाडी - ३३.१८ टक्केसुखना - ११ टक्केलहुकी - ०० टक्केटेंभापुरी - ३५ टक्केढेकू - १७.९७ टक्केनारंगी - १९ टक्केबोरदहेगाव - ०० टक्केवाकोद - २५ टक्केगिरजा - २७ टक्केअंबाडी - ००टक्के

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबादRainपाऊसJayakwadi Damजायकवाडी धरण