सरकारचे करायचे काय, ...खाली मुंडके वर पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:42 IST2017-10-03T00:42:09+5:302017-10-03T00:42:09+5:30
केंद्र, राज्य सरकारचे करायचे काय?... खाली मुंडके वर पाय’, ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस... शेतकºयांच्या गळ्यात पडलाय फास’, ‘महागाईने पसरले पाय जनतेने करायचे काय?’...अशा विविध घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीतर्फे स्वपक्षीय सरकार विरोधात महागाई दर कमी आणि जीएसटी रद्द करण्यासाठी निदर्शने.

सरकारचे करायचे काय, ...खाली मुंडके वर पाय
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘केंद्र, राज्य सरकारचे करायचे काय?... खाली मुंडके वर पाय’, ‘सरकारला लागली बुलेट ट्रेनची आस... शेतकºयांच्या गळ्यात पडलाय फास’, ‘महागाईने पसरले पाय जनतेने करायचे काय?’...अशा विविध घोषणांनी क्रांतीचौक परिसर दणाणला. निमित्त होते शिवसेना महिला आघाडीतर्फे स्वपक्षीय सरकार विरोधात महागाई दर कमी आणि जीएसटी रद्द करण्यासाठी निदर्शने.
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेना महिला आघाडीतर्फे मुंबई, ठाणे, नाशिक, पुणेनंतर औरंगाबादेत महागाई, जीएसटी विरोधात निदर्शने केली. या निदर्शनाचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या व संपर्कप्रमुख डॉ. मनीषा कायंदे मुंबईहून आल्या होत्या. दुपारी १२ वाजता क्रांतीचौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भगवा ध्वज फडकावून आंदोलनाला सुरुवात झाली. हे आंदोलन दोन तास सुरू होते. यावेळी बोलताना डॉ. कायंदे म्हणाल्या, मागील काही दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या किमती प्रतिलिटर तब्बल ८ ते १० रुपयांनी वाढल्या. घरगुती गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला. इतर दैनंदिन वापराच्या वस्तूही महागल्या आहेत. तरीही सरकार या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही पावले उचलत नाही. यासाठी शिवसेना सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करत असल्याचे डॉ. कायंदे यांनी सांगितले. क्रांतीचौकात चुलीवर भाकरी थापून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकाºयांनी भाकरी थापल्या. यानंतर सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. जीएसटीच्या करामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक घायकुतीला आला असल्यामुळे हा कर रद्द करण्याची मागणीही यावेळी केली. या आंदोलनात उपमहापौर स्मिता घोगरे, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक कला ओझा, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, नगरसेविका सुमित्रा हाळनोर, सीमा खरात, शिल्पा वाडकर, सीमा चक्रनारायण, ज्योती पिंजरकर, संगीता लोखंडे, आशा भालेराव, सुनीता आऊलवार, अंजली मांडवकर, प्र्रतिभा जगताप, प्राजक्ता राजपूत, आशा दातार, विद्या अग्निहोत्री, दुर्गा भाटी, रेखा वैष्णव, जयश्री घाडगे, सुलभा भोपळे, उज्ज्वला बिरारी यांच्यासह उपशहर, विभाग, शाखा संघटक, गटप्रमुख महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.