शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अन्ननलिकेचा कॅन्सर कशामुळे वाढतोय? लक्षणे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 20:12 IST

आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात.

छत्रपती संभाजीनगर : अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण वाढल्याचे दिसते. अन्ननलिकेचा कर्करोग हा सर्व कर्करोगांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे, तर भारतात मृत्यू होणाऱ्या सर्व कॅन्सरमध्ये याचा चौथा क्रमांक लागतो. पुरुषांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण महिलांपेक्षा काहीसे अधिक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधील रुग्ण या कर्करोगातून बरे होण्याचे प्रमाण खूप आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लक्षणे काय?९० टक्के रुग्णांना गिळण्याचा त्रास होतो. सुरुवातीला अन्न गिळण्यास त्रास व्हायला लागतो. नंतर पाणी पिण्यासही अडचण येते. आवाजात बदल होणे, सतत छातीत जळजळ होणे, वजन कमी होणे, भूक कमी होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, कधी कधी सततचा खोकला लागणे ही काही लक्षणे आहेत. ही लक्षणे असणे म्हणजे अन्ननलिकेचा कर्करोग आहेच असे नाही.

कारणे काय?तंबाखूचे सेवन, मद्याचे सेवन, अति प्रमाणात शिळे अन्न खाणे, जेवणामध्ये व्हिटॅमिन, तंतूमय, प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण कमी असणे, वर्षानुवर्षे जळजळीचा त्रास असणे, ‘बरेट्स इसोफागस’ किंवा ‘एकाजीआ’ हा आजार असणे, स्थूलपणा आदींमुळे अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.

निदान कसे करता येते?निदान करण्यासाठी अन्ननलिका, पोटाची एंडोस्कोपी व बायोप्सी करणे गरजेचे असते. आजार कोणत्या ‘स्टेज’मध्ये आहे, याचे निदान करण्यासाठी छाती, पोटाचे सिटी स्कॅन, पेट स्कॅन आदी तपासण्या कराव्या लागतात.

काळजी काय घ्याल?निर्व्यसनी राहणे, ताजे व्हिटॅमिनयुक्त, तंतूमय, व प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. नियमितपणे व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे आदी काळजी घ्यावी. काही लक्षणे असल्यास न घाबरता तज्ज्ञांचा सल्ला घेणे, ते सांगतील त्या तपासण्या करून घेणे महत्त्वाचे ठरते.

वर्षाला २० ते २२ शस्त्रक्रियाअन्ननलिकेच्या कर्करोगाच्या उपचारात बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया, किरणोपचार व किमो-औषधी या तिन्ही उपचारपद्धती लागतात. साधारणपणे वर्षाला २० ते २२ शस्त्रक्रिया शासकीय कर्करोग रुग्णालयात होतात. या शस्त्रक्रिया आता कमी त्रासाच्या लेप्रोस्कोपी किंवा रोबोटिक पद्धतीनेदेखील होऊ शकतात. तिसऱ्या पायरीतील रुग्णदेखील संपूर्ण उपचार केल्यास बरे होऊ शकतात. कधीही हिम्मत आणि बरे होण्याची आशा सोडू नये.- डाॅ. अजय बोराळकर, शासकीय कर्करोग रुग्णालय

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्यcancerकर्करोग