शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
4
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
5
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
6
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
7
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
8
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
9
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
10
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
11
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
12
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
13
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
14
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
15
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
16
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
17
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
18
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
20
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा

'ते १२५ दरोडेखोर सध्या काय करताहेत'; औरंगाबाद पोलिसांनी सुरू केला शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:09 IST

शहरात दरोड्याची घटना घडल्यास रेकॉर्डवरील आरोपीपर्यंत सहज पोहोचता यावे याकरिता त्यांची माहिती जमा केली जात आहे.

ठळक मुद्दे दरोड्याचा गुन्हा नोंद असलेल्या आरोपींची कुंडली जमा करण्याचा उद्देश५५ प्रश्नांची सरबत्ती आणि उत्तरे घेणे बंधनकारक

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : २००६ पासून आजपर्यंत दरोड्याचा गुन्हा नोंद असलेले शहरातील तब्बल १२५ आरोपी सध्या काय करीत आहेत, याची माहिती क्रांतीचौक पोलीस जमा करीत आहेत. प्रत्येक हवालदार आणि अधिकाऱ्यांनी पाच ते सहा दरोडेखोरांची माहिती जमा करण्याचे लक्ष्य ठरले आहे. 

शहरातील सर्वाधिक महत्त्वाचे पोलीस ठाणे म्हणून क्रांतीचौक ठाण्याकडे पाहिले जाते. अनुभवी पोलीस अधिकारी या ठाण्याचा प्रमुख असतो. क्रांतीचौक, मध्यवर्ती बसस्थानक, महावीर चौक आणि पैठणगेट, टिळकपथ, औरंगपुरा आणि जुना मोंढा असा महत्त्वाचा एरिया या ठाण्याच्या हद्दीत येतो.  

या ठाण्यात  दरमहा दाखल होणाऱ्या गुह्यांची संख्या १०० हून अधिक आहे. नागरी वसाहतीसोबत बाजारपेठ, सामाजिक आणि राजकीय चळवळीचे केंद्र ही याच ठाण्याच्या हद्दीत असल्यामुळे ठाणेदाराला २४ तास सतर्क राहावे लागते. गुन्हे होऊ नये याकरिता प्रभारी पोलीस अधिकाऱ्याला सतत संशयित लोकांवर आणि रेकॉर्डवरील  गुन्हेगारांवर नजर ठेवावी लागते. याअंतर्गत क्रांतीचौक ठाण्यात २००६ पासून आजपर्यंत दरोड्याचे गुन्हे नोंद असलेल्या १२५ गुन्हेगारांची कुंडली गोळा करणे सुरू केले. ठाण्यातील हवालदार आणि पोलीस अधिकारी यांना प्रत्येकी ५ ते ६ दरोडेखोरांची नावे देण्यात आली. या दरोडेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यातील काही संशयित दरोडेखोरांनी त्यांचा राहण्याचा पत्ता बदलला असण्याची शक्यता आहे. शहरात दरोड्याची घटना घडल्यास रेकॉर्डवरील आरोपीपर्यंत सहज पोहोचता यावे याकरिता त्यांची माहिती जमा केली जात आहे.

५५ प्रश्नांची सरबत्ती आणि उत्तरे घेणे बंधनकारकआरोपींना ठाण्यात बोलावून ते सध्या काय करतात, त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत किती गुन्हे नोंद आहेत. यापैकी किती  खटल्यात त्याला शिक्षा झाली आणि किती केसमध्ये तो निर्दोष सुटला, किती दिवस जेलमध्ये होता, जेलमधून कधी सुटला,  जामीनदार कोण आहेत, त्याच्या उपजीविकेचे साधन काय, त्याला किती बायका/प्रेयसी  आहेत, त्यांची नावे आणि पत्ता, त्याच्या मुलांची नावे आणि त्यांचा व्यवसाय काय, त्यांचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक आदी सुमारे ५५ प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून  घेऊन त्यांची कुंडली तयार करण्यास सांगितले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस