शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
2
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
3
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
5
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
6
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
7
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
9
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
10
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
11
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
12
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
13
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
14
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
15
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
16
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
17
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
18
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
19
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस कधी? दिल्लीत काहीच हालचाल नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:52 IST

नांदेडकडे पळविलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसकडे प्रवाशांची पाठच

छत्रपती संभाजीनगर : आगामी ३ महिन्यांत शहरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी ऑगस्टमध्ये दिले. परंतु ही रेल्वे सुरू करण्यासंदर्भात अद्यापही काही हालचाली नसल्याची स्थिती आहे. दुसरीकडे नांदेडला पळविलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरहून रिकामीच धावत असल्याची अवस्था आहे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार करण्यात आला. विस्तार करताना या रेल्वेची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे शहरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन खा. डाॅ. भागवत कराड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे शहरातून मुंबईसाठी नवीन वंदे भारत एक्स्प्रेसची मागणी केली. त्यांनी आगामी ३ महिन्यांत ही रेल्वे सुरू करण्याचे आश्वासन ऑगस्टमध्ये दिले. छत्रपती संभाजीनगरहून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या दृष्टीने ‘ऑपरेशनल फिजिबिलिटी चेक’ करण्यात यावे, असे आदेश अश्विनी वैष्णव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. परंतु तीन महिने होऊनही या नव्या रेल्वेसंदर्भात काही निर्णय का होत नाही, अशी ओरड प्रवाशांतून होत आहे.

७८० आसने रिकामी...नांदेडला पळविलेल्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या १८ नोव्हेंबर रोजीच्या ७८० आसने रिकामी होती. या रेल्वेचा वेळ बदलल्याने मुंबईला जाण्यास उशीर होत असल्याने प्रवाशांकडून अन्य रेल्वेला प्राधान्य दिले जात आहे.

स्वतंत्र रेल्वे आवश्यकनोव्हेंबर अर्धा गेला तरी रेल्वेमंत्र्यांनी आश्वासन दिलेली छत्रपती संभाजीनगर- मुंबई स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस अजून घोषित झालेली नाही. मराठवाड्यातील नेत्यांच्या एकमेकांवरील कुरघोडी करण्याच्या वृत्तीमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. छत्रपती संभाजीनगरची क्षमता आणि गरज पाहता सकाळच्या सत्रात स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेसची आवश्यकता आहे. रेल्वेमंत्र्यांनी यात लक्ष घालून नवीन वंदे भारत मंजूर करावी.- स्वानंद सोळंके, रेल्वे अभ्यासक

रेल्वेमंत्र्यांची पुन्हा भेट घेणारनव्या वंदे भारत एक्स्प्रेससाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची पुन्हा एकदा भेट घेणार आहे. पीटलाइनचे काम सध्या बाकी आहे. पीटलाइनचे काम पूर्ण होणेही आवश्यक आहे.- खा. डाॅ. भागवत कराड

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर