दलित वस्तीमधील विहीर ताब्यात घेतली
By Admin | Updated: July 13, 2014 00:29 IST2014-07-12T23:51:06+5:302014-07-13T00:29:35+5:30
हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील दलित वस्तीमधील विहीर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे केली आहे.

दलित वस्तीमधील विहीर ताब्यात घेतली
हिंगोली : तालुक्यातील जोडतळा येथील दलित वस्तीमधील विहीर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली असल्याची तक्रार येथील ग्रामस्थांनी जि.प. सीईओंकडे केली आहे.
यासंदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जोडतळा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विहिर तयार करण्यात आली आहे. ही विहिर येथील शेतकरी तथा कृषी सहाय्यक प्रकाश कावरखे यांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना विहिरीतून पाणी घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. याबाबत वर्षभरापासून त्यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी करूनही त्यांनी विहिर ग्रामस्थांच्या ताब्यात दिलेली नाही.
त्यामुळे या प्रकरणी योग्य प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनात धम्मपाल डोंगरदिवे, विठ्ठल जाधव, सिद्धार्थ पाईकराव, राहुल धुळधुळे, संतोष जाधव, भीमा डोंगरदिवे, सुनील जाधव, अविनाश डोंगरदिवे, नंदु खंडागळे, दिनकर चिपाडे, दीपक दिवटे, राजेश विटकर, हर्षल पाईकराव, बाळू जाधव, शैलेष जाधव, अंकुश दिवटे, पांडुरंग कऱ्हाळे आदींनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)