विहीर कोसळली
By Admin | Updated: September 4, 2014 00:19 IST2014-09-04T00:16:54+5:302014-09-04T00:19:22+5:30
पाथरी : सतत पाऊस पडत राहिल्याने जमिनीमध्ये पाणी साचले. यामुळे खेर्डा येथील एका शेतकऱ्याची विहीर कोसळल्याचा प्रकार ३ सप्टेंबर रोजी सकाळी घडला.

विहीर कोसळली
पाथरी : सतत पाऊस पडत राहिल्याने जमिनीमध्ये पाणी साचले. यामुळे खेर्डा येथील एका शेतकऱ्याची विहीर कोसळल्याचा प्रकार ३ सप्टेंबर रोजी सकाळी घडला. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
पाथरी तालुक्यात गत आठवड्यात तीन दिवस जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे नदी-नाल्यांना पाणी तर आलेच त्याचबरोबर गोदावरी नदीलाही पाणी आले. संततधार पावसामुळे शेतात पाण्याचे डोह साचले. जमिनीला ओलावा फुटला. तालुक्यातील खेर्डा येथील शेतकरी दगडू आमले यांच्या शेत गट नं. १०१ मध्ये ८ फूट खोदलेली जुनी विहीर आहे. या विहिरीचे विटांचे बांधकाम करण्यात आले होते.
विहिरीत पाणीही भरपूर होते. पावसामुळे विहिरीच्या बाजूचा भाग खचून ३ सप्टेंबर रोजी सकाळी विटाने बांधकाम केलेली विहीर कोसळली. सदरील शेतकरी शेतामध्ये सकाळी गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे.
(वार्ताहर)