वाळूजमध्ये एसआरपी सायकल रॅलीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 20:51 IST2019-02-28T20:51:01+5:302019-02-28T20:51:10+5:30
नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या एसआरपीच्या सायकल रॅलीचे गुरुवारी वाळूजमध्ये आगमन होताच नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वाळूजमध्ये एसआरपी सायकल रॅलीचे स्वागत
वाळूज महानगर : नागपूरहून मुंबईकडे निघालेल्या एसआरपीच्या सायकल रॅलीचे गुरुवारी वाळूजमध्ये आगमन होताच नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
राज्य राखीव पोलिस बलाच्या ७१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नागपूर ते मुंबई या सायकल रॅली काढण्यात आली आहे. नागपूर येथून २२ फेब्रुवारीला या सायकल रॅलीला सुरवात करण्यात आली असून, ९० सायकलस्वाराचा यात समावेश आहे. या माध्यमातून पर्यावरणाचे संतुलन, बेटी बचाव-बेटी पढाव, शिक्षण आदीविषयी जनजागृती केली जात आहे. याच बरोबर पोलिस प्रशासन, आपत्ती, शहीद झालेले जवान आदी विषयी नागरिकांना माहिती देऊन मार्गक्रमण करीत आहेत. मुंबईत ६ मार्चला या सायकल रॅलीचा समारोप केला जाणार आहे. शहरातून गुरुवारी या रॅलीचे वाळूजला आगमन होताच या रॅलीचे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांच्यावतीने उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रॅलीचे नेतृत्व करणारे फौजदार प्रफुल्ल खाडपकर, संजय कुंभार, संतोष घुमकर व त्यांच्या सहकाºयाचे स्वागत केले. यावेळी उपनिरीक्षक अमित बागुल, प्रिती फड, नारायण बुट्टे, पोहेकॉ.शेख सलीम, पोहेकॉ. शेख सलीम आदीसह कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती होती.