रावसाहेब दानवे यांचे जल्लोषात स्वागत
By Admin | Updated: May 30, 2014 00:27 IST2014-05-29T23:30:42+5:302014-05-30T00:27:33+5:30
जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे गुरूवारी जिल्ह्यात आगमन होताच विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

रावसाहेब दानवे यांचे जल्लोषात स्वागत
जालना - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे गुरूवारी जिल्ह्यात आगमन होताच विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. जालना शहरात मिरवणुकीद्वारे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आपला उत्साह व्यक्त केला. जालना शहरात औद्योगिक वसाहत भागात उद्योजक किशोर अग्रवाल व त्यांच्या सहकार्यांनी दानवे यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. दुपारी ३.३० वाजता मोतीबागेसमोरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, बबनराव लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, आ. संतोष सांबरे, अनिरुद्ध खोतकर, जि.प. अध्यक्षा आशाताई भुतेकर, पंडितराव भुतेकर, रिपाइंचे अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, शहराध्यक्ष वीरेंद्र धोका आदींनी दानवे यांचे स्वागत केले. मिरवणुकीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, भाऊसाहेब घुगे, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाला परदेशी, सतीश जाधव, रवींद्र देशपांडे, सिद्धिविनायक मुळे, राजू भालेराव, वंदना कुलकर्णी, अरूणा जाधव, शिवराज जाधव, सविता किवंडे, राधा गाडेकर, नंदा वाढेकर, गंगूबाई वानखेडे, शंकरराव मोरे, जगन्नाथ काकडे आदींचा सहभाग होता. मोतीबाग, कचेरी रोड, शनिमंदिर, गांधीचमन, मस्तगड, पाणीवेस, काद्राबाद, सराफा, फूलबाजार, बडीसडक मार्गे मिरवणूक मामा चौकात येऊन विसर्जित झाली. रमदुलवाडी पाटीवर स्वागत शेलगाव - बदनापूर तालुक्यातील रमदुलवाडी पाटीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. ४आ. संतोष सांबरे, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, भगवानसिंग तोडावत, भगवान कदम, भानुदास घुगे, भाऊसाहेब घुगे, गोरखनाथ खैरे, भरत सांबरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. रमदुलवाडी ते भराडखेडा रेल्वेपटरीवर गेट बसविण्यात यावे, या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. त्यावेळी सदरील गेट त्वरीत बसविण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही दानवे यांनी दिली. यावेळी सरपंच कचरूसिंग गुसिंगे, अंबरसिंग पहेलवान, शिवसिंग गुसिंगे, डॉ. घुणावत, खुशालसिंह खोलवार, परमेश्वर नाईकवाडे, बबन बोरूडे, मोरे, बोरूडे, भगवान मात्रे, विष्णू मात्रे, अंकुश वाघ, सुभाष रुद्रे, रवि मदन, ज्ञानेश्वर मात्रे, परमेश्वर मात्रे, सांडू वाघ, दिगंबर खडेकर, तुकाराम रेगुडे, प्रल्हाद पवार, अच्युतराव अंभोरे, जनार्दन अंभोरे, भगवान अंभोरे, भगवान जाधव, धोंडिराम पवार, वसंत जगताप, दिलीप कदम, ज्ञानेश्वर माऊली, लोंढे, दिलीप कदम, संदीप कदम, धुराजी इनामे, बळीराम मोरे, रामकिसन मोरे, विष्णू नाईकवाडे, सूर्यकांत नाईकवाडे, प्रल्हाद ताडगे, वैजिनाथ मोरे, दौलत नाईकवाडे, शिवाजी मदन, बाबा शिंदे, एकनाथ नाईकवाडे, संतोष सिनगारे, परमेश्वर नाईकवाडे, आबासाहेब मोरे यांच्यासह रमदुलवाडी, वरूडी, दुधनवाडी, केळीगव्हाण, मात्रेवाडी, शेलगाव, दावलवाडी, खादगाव, नागेवाडी येथील उपस्थिती होती. दानवे यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी स्वागत केले. शुभेच्छांचा स्वीकार मिरवणुकीतील रथामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे नागरिकांच्या अभिनंदनाचा, सत्काराचा स्वीकार करून त्यांचे आभार व्यक्त करीत होते. त्यांच्यासमवेत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, रिपाइंचे अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, भाऊसाहेब घुगे, जगन्नाथ काकडे, अंकुश पाचफुले आदींची उपस्थिती होती. बदनापूर तालुक्यात उत्स्फूर्त स्वागत बदनापूर - तालुक्यात जालना-औरंगाबाद महामार्गावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. वरूडी फाटा येथे दुपारी २ वाजता दानवे यांचे आगमन झाले. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असल्याने दानवे यांच्या कारला लाल दिवा नव्हता. मात्र दानवे यांचे आगमन होताच महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे स्वागत केले. आ. संतोष सांबरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, बद्रीनाथ पठाडे, भगवानसिंह तोडावत यांनी दानवे यांचे पुष्पहाराद्वारे स्वागत केले.