खड्ड्यांनी होतेय प्रवाशांचे स्वागत

By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-13T00:12:03+5:302014-07-13T00:18:33+5:30

औसा : औसा हे तालुक्याचे ठिकाण आहे़ येथूनच नागपूर-रत्नागिरी राज्यमार्ग जातो़ तसेच औसा बसस्थानकातून राज्यात व आंतरराज्यात बससेवा असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते़

Welcome to the potholes | खड्ड्यांनी होतेय प्रवाशांचे स्वागत

खड्ड्यांनी होतेय प्रवाशांचे स्वागत

औसा : औसा हे तालुक्याचे ठिकाण आहे़ येथूनच नागपूर-रत्नागिरी राज्यमार्ग जातो़ तसेच औसा बसस्थानकातून राज्यात व आंतरराज्यात बससेवा असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते़ पण येथील बसस्थानकात जाताना व स्थानकातून बाहेर पडताना दोन्ही प्रवेशव्दारात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ याकडे मात्र परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष असून प्रवाशी व पादचाऱ्यांना याचा त्रास सहन करावा लागतोय़
औसा बसस्थानकातून सोलापूर-पंढरपूर-कोल्हापूर-हैदराबाद-गुलबर्गा-औरंगाबाद-पुणे-नांदेड-आकोला यासह अनेक लांबपल्ल्याच्या गाड्या जातात़ या बसस्थानकातून येतात-जातात़ त्यामुळे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर प्रवाशी ये-जा करतात़ तसेच ग्रामिण भागासह जिल्ह्यात ही या बसस्थानकातून बसेस ची संख्या अधिक असल्याने प्रवाशाची गर्दी असते़
बसस्थानकात येताना आणि बसस्थानकातून बाहेर पडताना खड्डयाने स्वागत होते़ तर निरोप ही खड्ड्यानीच दिला जातो़ त्यामुळे प्रवाश्यांना मात्र त्रास सहन करावा लागतोय़(वार्ताहर)

Web Title: Welcome to the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.