नववर्षाचे उत्साहात स्वागत
By Admin | Updated: December 31, 2016 23:48 IST2016-12-31T23:47:18+5:302016-12-31T23:48:50+5:30
जालना : शहरासह जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात व आतषबाजी करून करण्यात आले.

नववर्षाचे उत्साहात स्वागत
जालना : शहरासह जिल्ह्यात नववर्षाचे स्वागत जल्लोषात व आतषबाजी करून करण्यात आले. नववर्षानिमित्त विविध हॉटेल व ढाब्यांवर मोठी गर्दी होती. काही मंदिरांमध्ये सुंदरकांड तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे करून नववर्षाला सुरूवात करण्यात आली. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जालनेकरांत मोठा उत्साहात दिसून आला.
२०१६ ला निरोप देण्यासाठी सायंकाळपासूनच तयारी करण्यात आली होती. हॉटेल, ढाब्यांवर विद्युत रोषणाईसोबतच फुलांनी सजविण्यात आले होते. २०१६ बाय तर २०१७ ला वेलकम असे फलक ठिकठिकाणी झळकत होते. सामाजिक संघटनांनी एकत्र सरत्या वर्षाला निरोप तर नव वर्षाच्या स्वागतासाठी विविध उपक्रमाचा संकल्प केला. येथील पाताल हनुमान मंदिरात सुंदरकांडचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वयोवृद्धांसोबतच युवा पिढीचा लक्षणीय सहभागी यावेळी दिसून आला. ग्रामीण भागात नववर्षाचे उल्हासात स्वागत करण्यात आले.
रात्री बाराच्या ठोक्यावर हॅपी न्यू इयर म्हणत ठिकठिकाणी नयनरम्य आतषबाजी करण्यात आली. आतषबाजीमुळे शहर उजळून निघाले होते. एकूणच २०१७ चे दणक्यात स्वागत करण्यात आले.