हजार रुपये देऊन कन्या जन्माचे स्वागत
By Admin | Updated: August 23, 2015 23:48 IST2015-08-23T23:24:06+5:302015-08-23T23:48:00+5:30
सखाराम शिंदे , गेवराई ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ अशी भाषणबाजी करणारे अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी पहावयास मिळतात; परंतु भेंड-सुलतानूपर येथील ग्रामसेवक आशिषकुमार रासवे

हजार रुपये देऊन कन्या जन्माचे स्वागत
सखाराम शिंदे , गेवराई
‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ अशी भाषणबाजी करणारे अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी पहावयास मिळतात; परंतु भेंड-सुलतानूपर येथील ग्रामसेवक आशिषकुमार रासवे यांनी वेतनातून एक हजार रुपये तरतूद करुन अनोखा पायंडा पाडला आहे.
शासनस्तरावरुन स्त्री जन्माच्या स्वागतासाठी विविध उपक्रम राबविले जातात. भेंड बु. व सुलतानपूर ग्रा.पं. चे ग्रामसेवक आशिषकुमार रासवे यांनी त्याही पलीकडे जाऊन स्वत: पदरमोड करुन स्त्रीजन्माच्या स्वागताचा उपक्रम सुरु केला आहे. २६ जानेवारी २०१५ रोजी त्यांनी गावात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीला एक हजार रुपये देण्याचे घोषित केले होते. आतापर्यंत गावात ८ मुली जन्माला आल्या. त्या सर्व मुलीच्या मातांना रासवे यांनी प्रत्येकी हजार रुपये सन्मानपूर्वक दिले. विशेष म्हणजे बेटी बचाओ कार्यक्रमातही त्यांचा विशेष सहभाग असतो. मुलगा- मुलगी हे एकसमान असून त्यांना सन्मानाने जगवावे, असे आवाहन करणारे फलक त्यांनी गावभर लावले आहेत. ग्रामसेवक रासवे यांनी गावात जन्माला येणाऱ्या कन्यांना हजार रुपये देण्याची मोहीम उघडली आहे. ही मोहीम यापुढेही सुरुच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.