शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

नळदुर्गकरांना भारनियमनाचे चटके

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

नळदुर्ग : विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नळदुर्ग शहराचा वसूलीचा दर्जा जी-३ मध्ये तर विद्युत गळती ७४.०७ टक्के पर्यंत पोहचल्याने शहरात

नळदुर्ग : विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे नळदुर्ग शहराचा वसूलीचा दर्जा जी-३ मध्ये तर विद्युत गळती ७४.०७ टक्के पर्यंत पोहचल्याने शहरात दररोज सव्वा नऊ तास भारनियमन होत सुरु झाले आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांतून संताप व्यक्त होत आहे.येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून नळदुर्ग अर्बनसह साखर कारखाना, वसंतनगर, चिकुंद्रा व मानेवाडी आदी गावांना विद्युत पुरवठा होतो. मागच्या तीन-चार महिन्यापासून विद्युत वितरणातील गळतीने ७४.०७ टक्के चा उच्चांक गाठला आहे. तर वसुली केवळ ४० टक्के झालेली आहे. या कारभारामुळे जिल्हा कार्यकारी अभियंत्याने नळदुर्ग शहरात १४ सप्टेंबरपासून सकाळी ५.३० ते ८.३० (३ तास), सकाळी ११.३० ते दुपारी २.४५ (३.१५ तास) तर सायंकाळी ७ ते रात्री १० (३ तास) असे भारनियमन करण्याचे आदेश दिल्याने मंगळवारपासून भारनियमनास प्रारंभ झालेला आहे. मिटर रिडींगप्रमाणे बिल न देणे, सार्वजनिक उत्सव व सणात विद्युत चोरीकडे दुर्लक्ष करणे, अनधिकृत कर्मचारी व अनधिकृत विद्युत पुरवठा यामुळे या उपकेंद्राच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिलावर फोटो मिटरचा असतो, रिडींगमध्ये युनिटऐवजी दिनांक दिसतो. असे असतानाही वापर युनिट लिहून बिल दिले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचा निपटाराही वेळेवर होत नसल्याने ग्राहक बिल भरत नाहीत. या सर्वच परिस्थितीत नियमित बिल भरणा करणारा मात्र संकटात सापडला आहे. याशिवाय वितरण कंपनी गळतीची तुट भरुन काढण्यासाठी ज्यादा बिल आकारणी करीत असल्याची ओरडही ग्राहकातून वाढत आहे. दिवसा ९ तासाचे विद्युत भारनियमन झाल्यास लघु उद्योजकांना दिवसभर रिकामे बसून रहावे लागणार आहे. शहरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे विद्युत भार नियमनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणार आहे.याशिवाय सेतू कार्यालय, बँका, पोस्ट आॅफीस, महाविद्यालये यांचा कारभार बहुतांश आॅनलाईन आहे. विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म कर्मचाऱ्यांच्या पगाराची माहितीही आॅनलाईन द्यावी लागते. अशा परिस्थितीत ९ तास भारनियमन झाल्यास सर्व स्तरातील नागरिकांची होरपळ होणार आहे. संबंधितांनी शहराचे भारनियमन रद्द करुन भोंगळ कारभार सुधारावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)