शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार विद्यार्थ्यांचे वजन कमी; शाळांमध्ये होणार ‘खिचडी’ची परीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 16:57 IST

शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो, तर मग ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी कसे

ठळक मुद्देजिल्ह्यात ४ लाख ८० हजार ५८३  विद्यार्थी   केंद्र सरकारचे अधिकारी घेणार शालेय पोषण आहाराचा आढावा

- विजय सरवदे 

औरंगाबाद : शाळांमध्ये रोज पोषण आहार दिला जातो, तर मग जिल्ह्यातील ४ लाख ८० हजार ५८३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा कमी कसे, हा प्रश्न या योजनेच्या अंमलबजावणीवरच उपस्थित करणारा आहे.

शालेय पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांचे पथक ३ ते १० डिसेंबरदरम्यान राज्यातील शाळांना अचानक भेटी देणार आहे. या पथकात डॉ. उमा अय्यर, जी. विजया भास्कर, डॉ. स्वाती धु्रुव, सुनील चौहान, डॉ. यास्मीन अली हक, भूपेंद्र कुमार, दिनेश प्रधान, डॉ. श्रुती कंटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल आणि मयुरी राणे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकातील काही अधिकारी ५, ६ डिसेंबर यापैकी कोणत्याही दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजना राबविणाऱ्या कोणत्याही शाळांना अचानक भेटी देऊन तपासणी केली जाणार आहे. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अधिकारीही असतील; पण त्यांच्यापासूनही शाळा भेटीच्या कार्यक्रमाची संपूर्ण गुप्तता पाळली जाणार आहे.

हे पथक शाळांमध्ये शालेय पोषण योजना लाभदायी आहे का, शाळांमध्ये सकस, सात्त्विक, पौष्टिक व पुरेसे मध्यान्ह भोजन दिले जाते का, मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारले आहे का, पुरवठादारांकडून तांदळाचा योग्य पुरवठा होतो का, या व इतर बाबींच्या उत्तरांसाठी आता गुरुजींना तयार राहावे लागणार आहे. केंद्र सरकारी अधिकाऱ्यांच्या पथकांमार्फत शालेय पोषण आहार योजनेचे रेकॉर्ड, शिजविण्याचे ठिकाण, भांडी, स्वच्छता, मध्यान्ह भोजन निकषानुसार शिजविले जाते का, त्यामध्ये ठरवून दिलेल्या अन्न घटकांचा समावेश केला जातो का, पुरवठादारांमार्फत शाळांपर्यंत तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा होतो का, शाळांमध्ये तांदूळ व धान्यादी मालाची निगा राखली जाते का, किती मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, किती मुलांची प्रकृती खराब आहे, किती मुले गंभीर आजारी आहेत, यासह अनेक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.

जिल्ह्यातील ६ हजार ६४ शाळांपैकी ३ हजार २७ शाळांमध्ये खिचडीजिल्ह्यातील एकूण ६ हजार ६४ शाळांपैकी ३ हजार २७ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. या शाळांतील इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत २ लाख ९५ हजार १८६ विद्यार्थी, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ८५ हजार ३४७ विद्यार्थी, असे एकूण ४ लाख ८० हजार ५८३ विद्यार्थ्यांना रोज पोषण आहार (खिचडी) दिला जातो. पोषण आहार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तेव्हा तब्बल ३ लाख ४४ हजार २३५ विद्यार्थ्यांचे वजन जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या शरीर वस्तुमान निर्देशांकापेक्षा (बीएमआय) कमी अर्थात एवढी मुले कमी वजनाची आढळून आली आहेत. १ लाख ३४ हजार ५३६ विद्यार्थ्यांचे सामान्य व १ हजार ८१२ विद्यार्थ्यांचे सामान्य वजनापेक्षा अधिक वजनाची आढळून आली आहेत. ७३ विद्यार्थी गंभीर आजारी, तर ४४० विद्यार्थ्यांमध्ये दृष्टिदोष असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे शालेय पोषण आहार योजनेचे वरिष्ठ लेखाधिकारी राजेंद्र खाजेकर यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSchoolशाळाStudentविद्यार्थीCentral Governmentकेंद्र सरकारTeacherशिक्षक