पाच ग्रामपंचायतींचा भार एका ग्रामसेवकावर

By Admin | Updated: July 13, 2014 00:18 IST2014-07-13T00:10:33+5:302014-07-13T00:18:24+5:30

जळकोट : तालूक्यातील २३ ग्रामसेवक विविध मागण्यासाठी संपावर गेल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची कामे खोळंबली होती़

The weight of five Gram Panchayats on a gram saver | पाच ग्रामपंचायतींचा भार एका ग्रामसेवकावर

पाच ग्रामपंचायतींचा भार एका ग्रामसेवकावर

जळकोट : तालूक्यातील २३ ग्रामसेवक विविध मागण्यासाठी संपावर गेल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची कामे खोळंबली होती़ यामुळे तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या कामाबद्दल अडचण निर्माण होवू नये, यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी विविध महत्त्वाच्या प्रमाणपत्र स्वाक्षरीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे़
कृषी अधिकारी यू.डी़शेख-बोरगाव, एकुकी, तिरूका, सुल्लाळी, मरसांगवी, फड एस़डी़-उमरदरा, केकतसिंदगी, ढोरसांगवी, यलदरा, हावरगा, हणमंतराव राठोड-होकर्णा, चेरा, उमरदरा, जगळपूर, दयानंद घटेवाड-जळकोट, रावणकोळा, हाळदवाढवणा, वांजरवाडा, माळहिप्परगा, केदासे बी़वाय़धतनूर, गव्हाण, मेवापूर, गुप्ती, घोणसी, शिवाजीनगर तांडा, चिंचोली, चव्हाण एऩएस़-सोनवळा, कोनाळ, कुणकी, विराळ, कोळनूर, कंरजी, दाडगे़व्ही़जी़-बेळसांगवी, लाळी, पाटोदा (बु़), मगरूळ, लाळी (बु़) या गावातील कामासाठी अधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांसाठी नियुक्त करण्यात आले आहे़
या गावांतील नागरिकांनी जळकोट पंचायत समितीला स्वाक्षरीसाठी येताना त्या-त्या गावातील सरपंचांची स्वाक्षरी तसेच निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड सोबत आणणे गरजेचे असल्याची माहिती गटविकास अधिकारी मुक्कावार, एस़डीफ़ड यांनी दिली़(वार्ताहर)

Web Title: The weight of five Gram Panchayats on a gram saver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.