वाशी तालुक्यातील १६६६ ग्राहकांना वर्षभराची सूट
By Admin | Updated: January 4, 2016 00:01 IST2016-01-03T23:32:35+5:302016-01-04T00:01:42+5:30
वाशी : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील केबल ग्राहकांसाठी ३१ डिसेंबर २०१६ ही अंतीम मुदत आहे़ त्यामुळे आणखी वर्षभर तालुक्यातील १६६६ ग्राहकांना

वाशी तालुक्यातील १६६६ ग्राहकांना वर्षभराची सूट
वाशी : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील केबल ग्राहकांसाठी ३१ डिसेंबर २०१६ ही अंतीम मुदत आहे़ त्यामुळे आणखी वर्षभर तालुक्यातील १६६६ ग्राहकांना ‘सेट टॉप बॉक्स’पासून सुटका मिळणार आहे़ असे असले तरी सध्या केबल चालकांकडून मिळणाऱ्या सेवेतील तांत्रिक त्रुटींमुळे टीव्ही संचावरील चित्र अस्पष्ट दिसत असल्याने अनेक ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़
वाशी शहरात एक केबल चालक असून, डिसेंबर अखेरपर्यंत पर्यंत त्यांच्याकडे ४०० ग्राहक होते़ प्रत्येकी प्रतिमाह १५० रुपये प्रमाणे कर आकारणी केली जात होती़ तहसिलदार सुरेंद्र डोके व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहरातील केबल ग्राहकांची यादी बनविण्याचे काम हाती घेतले होते़ त्यानंतर संबंधितांकडून शहरातील ६२१ कनेक्शनची यादी महसूल विभागाकडे सूपूर्द करण्यात आली़ शहरातील ग्राहकांना सध्या ३७ चॅनल दाखविण्यात येत आहेत़ या सेवेतही तांत्रिक अडचणी असल्याने ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे़ तक्रारी नोंदविल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दुरूस्ती करण्यात येते़ मात्र, काही दिवसानंतर सेवा पुन्हा विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे़ तालुक्यातील तेरखेडा येथे एक केबल चालक असून त्यांच्याकडे सटवाईवाडी, खामकरवाडीसह इतर गा्रमीण भागातील केबजलोडणी असून, ग्राहकांची संख्या ४७३ आहे़ तर पारगाव येथे दोन केबल चालक असून त्यांच्याकडे ३४६ टीव्हीस केबल ग्राहक आहेत़ घाटपिंंपरी येथे १२५ केबल ग्राहक आहेत़ दरम्यान, तालुक्यातील सर्वच केबल ग्राहकांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत ‘सेट टॉप बॉक्स’ बसविण्यासाठी मुभा मिळणार आहे़ त्यानंतर मात्र, ग्रामीण भागातील प्रत्येक टीव्ही संचास ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे अनिवार्य राहणार आहे़ दरम्यान, ‘सेट टॉप बॉक्स’ बाबत तहसिलदार डोके यांना विचारले असात, तालुक्यातील केबल ग्राहकांनी ‘सेट टॉप बॉक्स’ बसविणे आवश्यक असल्याबाबत अद्याप आदेश आलेले नाहीत़ तुर्तास या सुविधेपासून तालुका तूर्तास वगळला असल्याचेही ते म्हणाले़ तर केबल चालक राजू शिंदे यांनी अद्याप ‘सेट टॉप बॉक्स’ बाबत सूचना नसल्याचे सांगून चालू वर्षात मात्र, ग्राहकांना मुदतीपूर्वीच ‘सेट टॉप बॉक्स’ बसवून घ्यावे लागणार आहेत़