मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार
By Admin | Updated: October 11, 2014 00:39 IST2014-10-11T00:20:00+5:302014-10-11T00:39:48+5:30
औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत.

मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद राहणार
औरंगाबाद : मतदानाच्या दिवशी नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी १५ आॅक्टोबर रोजी जिल्ह्यात भरणारे सर्व आठवडी बाजार बंद ठेवले जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने उपनिबंधक कार्यालयाला तशा सूचना दिल्या आहेत.
विधानसभेच्या सर्व जागांसाठी राज्यात १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेतले जाणार आहे. जिल्ह्यात या ठिकाणी अनेक ठिकाणी आठवडी बाजार भरतो.
आठवडी बाजार भरल्यास अनेकांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी मतदानाच्या दिवशी १५ आॅक्टोबर रोजीचे सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने उपनिबंधक कार्यालयाला पत्र पाठवून हे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.