आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2017 00:30 IST2017-05-18T00:27:48+5:302017-05-18T00:30:44+5:30
परतूर : शहरातील आठवडी बाजारात चोरांचा सुळसूळाट वाढला

आठवडी बाजारात चोरट्यांचा सुळसुळाट
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : शहरातील आठवडी बाजारात चोरांचा सुळसूळाट वाढला असून, मोबाईल व रोख पैसे चोरीस जाण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.
शहरात गाव व मोंढा भागात दर शनिवारी आठवडी बाजार भरतो. या बाजाराचे स्वरूप आता मोठे झाले आहे. शहरासह पन्नास ते साठ खेड्यांमधून या बाजारात व्यापारी व खरेदीदार येतात. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची संख्या वाढत आहे. दर बाजारात पैसे व मोबाईल चोरीच्या घटना घडत आहेत. मागील महिन्यात तर, एकाच दिवशी अनेक मोबाईल चोरीस गेले होते. पोलिसात तक्रार देवून उपयोग होत नसल्याने नागरिक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. पोलिसांनी या बाजारात गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.