शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातील स्वीटडिशने विषबाधा; बाधितांचा आकडा किरकोळ असल्याचा कदीर मौलाना यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:26 IST

सध्या घाटी रुग्णालयात एकावर तर एमजीएम रुग्णालयात १४ जणांवर उपचार सुरु आहेत.

औरंगाबाद:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अब्दुल कदिर मौलाना यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यानिमित्त बुधवारी रात्री मदनी चौक येथे जेवणाचा कार्यक्रम होता. येथे जेवणानंतर स्वीटडिश खाल्याने रात्रीच अनेकांना उलट्या, मळमळ,जुलाब असा त्रास सुरु झाला. रात्रीतून त्रास जाणवणारे पाहुणे घाटी रुग्णालय आणि एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान, अनेकांना रात्रीच सुटी देण्यात आली असून दोन्ही रुग्णालयात मिळून सध्या १५ जणांवर उपचार सुरु आहेत. 

लग्न समारंभाच्या जेवणातून विषबाधा झाल्याने प्रकृती बिघडून २२ जण घाटी रुग्णालयात तर ४९ जण एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. काहींना रात्रीच उपचार करून सुटी देण्यात आली. सध्या घाटी रुग्णालयात एकावर तर एमजीएम रुग्णालयात १४ जणांवर उपचार सुरु आहेत. उपचार सुरु असलेल्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. जेवणानंतर स्वीटडिश खाल्यानंतर त्रास सुरु झाल्याचे बाधीतांनी सांगितले. दरम्यान, याबाबत अनेक अफवा सकाळपासून शहरात पसरल्या होत्या. चारशे ते सातशे जणांना विषबाधा झाल्याचे बोलले जात होते. मात्र, कदीर मौलाना यांनी यावर स्पष्टीकरण देत बाधितांचा आकडा फुगवून सांगण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच उपचार सुरु असलेल्यांचा आकडा किरकोळ असल्याचा दावा ही त्यांनी केला आहे.

आकडा फुगवून सांगितला जात आहे दहा बारा लोकांना जेवणानंतर उलट्या झाल्या. ते उपचारार्थ एमजीजममध्ये दाखल झाल्यानंतर मी स्वतः हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो. दोघे तिघे घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यापेक्षा ही घटना मोठी नाही. पाचशे वा सातशे जणांना विषबाधा झाली, हे धादांत खोटे आहे. यात काही काळेबेरे आहे का, कुणी घडवून आणले का, असे मी आताच म्हणू शकत नाही.- कदीर मौलाना, राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसfood poisoningअन्नातून विषबाधा