शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

एक विवाह ऐसा भी !; वऱ्हाडाने आणले जेवणाचे डबे अन् १७ मिनिटांत पार पडला सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 18:40 IST

अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

ठळक मुद्देसर्व खर्चास फाटा दिला छावणीत पार पडला लग्नसोहळा 

औरंगाबाद : शहरात सध्या लग्नसराईची धुमधाम सुरू असून, प्रत्येक लग्नसोहळ्यात वऱ्हाडींना पंचपक्वान्नांचे शाही भोजन दिले जात आहे. मात्र, छावणीत रविवारी एका लग्नात चक्क वऱ्हाडींनी घरूनच जेवणाचे डबे आणून तेथे जेवण केले. कारण, वधू-वर पित्यांवर लग्नाचा कोणताही भार पडू नये. अनावश्यक खर्च व अनिष्ट चालीरीतींना फाटा देत लग्न लावण्यात यावे ही वधू-वरांचीच नव्हे, तर संपूर्ण वऱ्हाडींची इच्छा होती. 

छावणीतील जैस्वाल मंगल कार्यालयात दुपारी १.३० वाजता लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. पैठण तालुक्यातील जांभळी येथील वनिता चव्हाण व वाशिम येथील शेगी गावातील सुनील राठोड यांच्या विवाहासाठी शेकडो वऱ्हाडी जमले होते. मात्र, कोणत्याही प्रकारचे बॅण्डपथक, डीजेचा दणदणाट नाही. वरात नाही, मंगलाष्टक म्हणण्यात आले नाहीत. लग्नासाठी येणारा प्रत्येक जण संत रामपालजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन खाली सतरंजीवर बसत होता. 

केवळ धागा बांधून विवाह ठरलेल्या वेळी वधू-वर आले. त्यांनी एकमेकांना हार न घालता केवळ धागा बांधला आणि रमैनी (दुपारची आरती) सुरू झाली. अवघ्या १७ मिनिटांत विवाह सोहळा पार पडला. यानंतर वधू-वराला उपस्थित वऱ्हाडींनी भावी आयुष्याबदल शुभेच्छा दिल्या. लग्नात कोणताही खर्च न करण्याचा ठरविल्याने जेवणावळीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. वऱ्हाडींनी घरूनच अन्नपाणी आणले होते. अनेक जण वधू-वराला आशीर्वाद देऊन निघून गेले. कोणत्याही प्रकारचा भेटवस्तू, हारतुऱ्यांचा वापर येथे करण्यात आला नाही. 

असे विवाह अधिक व्हावेत नवरदेवाचे वडील रामजीदास चव्हाण म्हणाले की, आमच्या गुरूच्या शिकवणीनुसार आम्ही हुंडा न घेता, संसारोपयोगी वस्तू न घेता-देता,अहेर, प्रतिअहेर, असे काहीही न घेता, तसेच कोणताही अतिरिक्त खर्च न करता विवाह पार पाडला आहे. मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. तो प्रकार रोखण्यासाठी अशा पद्धतीचे विवाह काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

अनिष्ट चालीरीतींना फाटा देण्यासाठी रमैनी विवाह रमैनी विवाहात वधू-वर पित्याला कुठलेही कार्यालय भाडे, वीज बिल, सफाई खर्च आदी द्यावे लागत नाही. विवाहाची कायदेशीर नोंदणी करण्यात येते. विवाह सोहळा सत्संगामधील एका १७ मिनिटांच्या आरतीने पार पडतो.  रमैनी विवाहामुळे समाजाचा कर्जबाजारीपणा, आत्महत्या, स्त्रीभ्रूणहत्या कमी होतील, समाजप्रबोधनासाठी असे विवाह होणे अपेक्षित असून, आज काही जणांनी त्यांच्या मुला-मुलींचे विवाह असेच करण्याचा निर्णय जाहीर केला असल्याची माहिती अशोकदास आव्हाड यांनी दिली. 

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादSocialसामाजिक