शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

‘एसटी’च्या चालक-वाहकांना लग्नपत्रिका, रेल्वे तिकीट जोडले तरच मिळते रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:35 AM

आजारी असल्यास ‘प्रिस्क्रिप्शन’ही जोडावी लागते

ठळक मुद्देचालक- वाहकांना सुटीसाठी द्यावा लागतो कारणांचा पुरावा

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : एसटी महामंडळातील चालक-वाहकांनी एखाद्या कारणासाठी रजा मागितली, तर त्या कारणाचा पुरावा दिल्यानंतरच सुटी मंजूर होते. नातेवाईकांचे असो की, खुद्द स्वत:चे लग्न, आजारापण अशा अनेक कारणांसाठी रजा घेताना पुरावा द्यावा लागतो. त्यामुळे सुटीसाठी रजेच्या अर्जासोबत डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन, रेल्वेचे तिकीट, लग्नपत्रिका, अशा अनेक बाबी जोडण्याची दुर्दैवी वेळ चालक- वाहकांवर येत आहे. 

घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान एसटी महामंडळातील चालकाच्या भावाचा १४ मे रोजी मृत्यू झाला. मात्र, अंत्यविधीसाठी सुटी मंजूर करून घेण्यासाठी भावाचा मृतदेह थेट रुग्णवाहिकेने सिडको बसस्थानकात घेऊन येण्याची वेळ चालकावर ओढावली. या घटनेविषयी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांतून हळहळ आणि प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाच्या चालक-वाहकांवर ही वेळ का ओढावत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. तेव्हा चालक-वाहकांनी एखाद्या कारणासाठी रजा मागितली तर ती मंजूर करून घेण्यासाठी काय करावे लागते, याचा उलगडा झाला. 

एखाद्या कारणासाठी सुटी लागत असेल तर चालक-वाहक आगार व्यवस्थापकांकडे अर्ज करतात. अर्ज केल्यानंतर नेमक्या कोणत्या कारणासाठी रजा, सुटी मागितली जात आहे, याची पडताळणी केली जाते. कर्मचाऱ्याने ज्या कारणासाठी सुटी मागितली ते कारण योग्य असेल तरच रजा मंजूर केली जाते. त्यामुळे त्याचा पुरावाच देण्याची वेळ चालक-वाहकांवर येते. नातेवाईकांचे लग्न असेल तर लग्नपत्रिका अर्जासोबत जोडावी लागते. अचानक एखाद्या दिवशी आजारामुळे कामावर गैरहजर राहिल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनचा पुरावाही द्यावा लागतो. काही कामानिमित्त प्रवास करणे गरजेचे असेल आणि तो प्रवास रेल्वेने होणार असेल तर रेल्वेच्या तिकिटाची प्रत पुरावा म्हणून द्यावी लागते. जे कारण असेल ते खरे असल्याचा एकप्रकारे पुरावाच द्यावा लागत असल्याचे चालक-वाहकांनी सांगितले. 

प्रवाशांच्या सेवेत कायम तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या गरजेचे आणि अडचणीच्या वेळेस सुटी मिळविण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अर्जासोबत पुरावा जोडण्याची ही पद्धत कोणत्याही अन्य प्रशासकीय सेवेत नाही. त्यामुळे महामंडळातील ही परिस्थिती दूर करण्याची गरज आहे. अन्यथा यापुढेही एखाद्या कर्मचाऱ्याला सुटीसाठी नातेवाईकाचा मृतदेह दाखविण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

स्वत:च्या लग्नाचीही पत्रिकाचालक-वाहकांना स्वत:च्या लग्नासाठी रजा मिळविण्यासाठी चक्क लग्नाची पत्रिका अर्जासोबत द्यावी लागते. ‘लोकमत’ने पाहणी केली तेव्हा स्वत:च्या लग्नासाठी रजा मिळविण्यासाठी एका कर्मचाऱ्याला अर्जासोबत लग्नपत्रिका जोडावी लागल्याचे आढळून आले.  लग्नाची पत्रिका जोडल्यानंतर मोजक्याच सुट्या मिळतात. अवघ्या काही दिवसांत पुन्हा कर्तव्यावर हजर राहण्याच्या अटीवरच रजा मंजूर केली जाते.

अधिक पुष्टी मिळतेरजेसाठी जे कारण अर्जात नमूद केलेले असते, त्या कारणाला अधिक पुष्टी मिळावी, यासाठी चालक-वाहकच लग्नपत्रिका जोडतात. तसे काही त्यांना बंधनकारक नाही. रेल्वेचे तिकीट, डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन अशी काहीही कागदपत्रे जोडण्याची गरज नाही. आजारपणासंदर्भातील सुटीसाठी मेडिकल सर्टिफिकेट द्यावे लागते.- किशोर सोमवंशी, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ

टॅग्स :state transportएसटीAurangabad Central Bus Standऔरंगाबाद मुख्य बसस्थानकAurangabad Cidco Bus Standऔरंगाबाद सिडको बसस्थानकAurangabadऔरंगाबाद