शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

आमचं विद्यापीठ आम्ही वाचवूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 1:09 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने चालविलेला अनागोंदी कारभार मोडून काढत महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ बदनामीपासून वाचविणार असल्याचा निर्धार दहापेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी बुधवारी व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाने चालविलेला अनागोंदी कारभार मोडून काढत महामानवाच्या नावाने असलेले विद्यापीठ बदनामीपासून वाचविणार असल्याचा निर्धार दहापेक्षा अधिक प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी बुधवारी व्यक्त केला. मागील आठवड्यात उघडकीस आलेले नापास विद्यार्थ्यांना पदवी वाटप प्रकरण हा सर्व अनागोंदीचा कडेलोट असून, यापुढे लोकशाही मार्गाने प्रशासनाला धडा शिकविणार असल्याचेही यावेळी आंदोलकांनी स्पष्ट केले.विद्यापीठातील प्रशासकीय इमारतीसमोर विद्यापीठ बचाव कृती समितीतर्फे बुधवारी दुपारी १ ते ४ या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात बामुक्टो, बामुक्टा, मुप्टा, महात्मा फुले समता परिषद, एसएफआय, राष्ट्रीय बंजारा परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी काँगे्रस, शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठवाडा विकास कृती समिती, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, बीएड-बीएड कृती समिती, पुरोगामी शिक्षक संघटना या प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी सहभाग नोंदविला. यावेळी मनोगत व्यक्त करताना विद्यापरिषद सदस्य डॉ. प्रतिभा अहिरे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ‘सिबॉल आॅफ नॉलेज’चे प्रतीक आहेत. मात्र त्यांना एका विशिष्ट विचारसरणीच्या दावणीला बांधण्याचे काम स्वार्थापोटी कुलगुरू करीत आहेत. याशिवाय विद्यापीठात सुरू असलेला भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार हा महापुरुषांच्या नावाची बदनामी करणारा आहे. आता मराठवाड्यातील स्वाभिमानी माणूस हे सहन करणार नसल्याचे सांगितले. प्रा. सुनील मगरे म्हणाले, मागील वर्षभरापासून संघ विचारसरणीच्या तालावर कुलगुरू काम करीत आहेत. बाबासाहेबांना गुरू मानलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संघ विचारांच्या लोकांना बोलावले. यावरून समजून घ्या, विद्यापीठ कोण चालवते. हे सर्व बंद करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही प्रा. मगरे यांनी केले. डॉ. स्मिता अवचार म्हणाल्या, मागील काही दिवसांपासून विद्यापीठातील प्राध्यापकांनाही काम करणे अवघड बनले आहे. याविरोधात कोणीही बोलायला तयार नाही. मात्र आता अती झाल्यामुळे त्याचा प्रतिकार करावाच लागणार आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे, बामुक्टोचे डॉ. मारोती तेगमपुरे, डॉ.विक्रम खिलारे, डॉ. शफी शेख, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. अशोक पवार, अ‍ॅड. संजय काळबांडे, अ‍ॅड. सुभाष राऊत, अक्षय पाटील, मयूर सोनवणे आदींनी मनोगत व्यक्त केले. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कुलगुरू , प्रशासनाच्या विरोधात दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. राम चव्हाण, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, अभिजित देशमुख, डॉ. संभाजी वाघमारे, प्रा.शिवानंद भानुसे, डॉ. भारत खैरनार, प्रा.रमेश भुतेकर, सुनील राठोड, लोकेश कांबळे यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :universityविद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्र