शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

'संशोधनासाठी गाईड द्या!', पत्रकारितेच्या संशोधक विद्यार्थ्यांचे विद्यापीठात बेमुदत उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2023 12:12 IST

फेलोशिपधारक व पेट-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आंतरविद्या शाखे अंतर्गत रिसर्च गाईड देण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात एम.िफलचे संशोधन पूर्ण केलेल्या फेलोशिपधारक व पेट २०२१ उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पीएच.डीसाठी आंतरविद्याशाखेअंतर्गत रिसर्च गाईड (संशोधन मार्गदर्शक) तत्काळ उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी शनिवारपासून (11मार्च) संशोधक विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सुरू केले आहे. आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, यावर आंदोलक संशोधक विद्यार्थी ठाम आहेत.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात एम.फिल करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी), राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन मानव विकास संस्था पुणे (सारथी), महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण नागपूर (महाज्योती), राजीव गांधी राष्ट्रीय फेलोशिप, मौलाना आजाद राष्ट्रीय फेलोशिप  पीएच.डी साठी JRF ते SRF अशी सलग  करण्यात आलेली आहे. परंतु जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात रिसर्च गाईड (संशोधन मार्गदर्शक) उपलब्ध नसल्याने फेलोशिपधारकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले,  प्र. कुलगुरू, कुलसचिव यांच्याकडे वारंवार मागणी करूनही एम.फिल पूर्ण करणाऱ्या फेलोशिधारक व पेट-२०२१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड मिळाले नाहीत. त्यामुळे फेलोशिपधारकासह पेट उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.  विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना तत्काळ रिसर्च गाईड उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी संतापलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारपासून (११ फेब्रुवारी) विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. रिसर्च गाईड मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील यावर संशोधक विद्यार्थी गणेश शिंदे, नागेश सोनोने, भास्कर निकाळजे, विद्या वाघमारे, श्रद्धा खरात, लक्ष्मीकांत जाधव, सुमेध हिवराळे, एम. एल. शेळके आदी ठाम आहेत.

गाईड देणे विद्यापीठाची जबाबदारीविद्यापीठ प्रशासनाने पाली अॅण्ड बुद्धीझम, लिबरल आर्टस्, फाईन आर्टस्, ग्रंथालय व माहितीशास्त्र, ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास, फुले-आंबेडकर विचाराधारा, शिक्षणशास्त्र इत्यादी विषयात आंतरविद्याशाखे अंतर्गत पीएच.डीसाठी रिसर्च गाईड उपलब्ध करून दिले आहेत. परंतु जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागातील संशोधकांना गाईड दिले नाहीत. विद्यार्थ्यांना रिसर्च गाईड उपलब्ध करून देणे ही विद्यापीठाची जबाबदारी आहे.  आंतरविद्या शाखेअंतर्गत इतर विषयाच्या रिसर्च गाईडच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संशोधकांनी केली होती मात्र यावर विद्यापीठ प्रशासन गांभीर्याने विचार करत नाही, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Law Collegeडॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयEducationशिक्षणStudentविद्यार्थी