शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

शिंदेसेनेचे खासदार, आमदार आम्हीच निवडून आणले; स्वबळावर महापालिका लढा, भाजपचा सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:45 IST

येणाऱ्या महापालिका निवडणुका या भाजपने स्वबळावर लढाव्यात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यावर अन्याय होऊ नये

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्याचा खासदार, शहरासह ग्रामीणमधील शिंदेसेनेचे आमदार भाजपच्या कार्यकर्त्यांच्या, नेटवर्कच्या बळावर निवडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुका या भाजपने स्वबळावर लढाव्यात. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांना संधी मिळावी. भाजपचा महापौर महापालिकेत बसावा, असा सूर रविवारी नवनिर्वाचित शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्या पदग्रहण समारंभात आळविण्यात आला. संघटनेतील गटबाजीवर देखील बोट ठेवण्यात आले. यावेळी बोराळकर यांच्या काळातील अनेक पदाधिकारी गैरहजर होते.

मावळते शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी समर्थन देत निश्चितपणे महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, असे आश्वासित केले. पक्षाच्या विभागीय कार्यालयात झालेल्या पदभार समारंभाप्रसंगी यावेळी आ. संजय केणेकर, माजी महापौर भगवान घडमोडे, जालिंदर शेंडगे आदींची उपस्थिती होती.

बोराळकर म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. यामुळे या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाचे फळ मिळावे, यासाठी निवडणुका स्वबळावर लढाव्यात व भाजपचा महापौर बसवावा. आ. केणेकर म्हणाले, पक्षाने संघटनेला बळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

दबावाला बळी पडू नकाशहराध्यक्षाला कसरत करून डोलारा सांभाळावा लागतो. दबावाला बळी पडू नका. बळी पडलात तर कामे करणे अवघड होते, असा शितोळेंना माझा सल्ला आहे. पाय ओढणारे अनेकजण आहेत. सोबत काम करणारे कमी आहेत. मला काही निवडणूक लढायची नाही. माझे कुणीही पंटर नव्हते, गटबाजीला मी थारा दिला नाही. ज्यांनी काम केले, त्यांना कामे देऊन सांभाळले. पक्षाला ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ कार्यकर्ते लागतात. संघटना आणि इव्हेंट असे जिल्हाप्रमुख पक्षाला असावेत.- शिरीष बोराळकर, माजी शहराध्यक्ष.

पूर्ण ताकदीनिशी भाजपचा महापौर होईलमहापालिका निवडणुकीनंतर भाजपचा महापौर पूर्ण ताकदीनिशी बसेल. शहराध्यक्षाला संघटनेसाठी काम करावे लागते. त्याचे वैयक्तिक काहीही काम नसते. नूतन शहराध्यक्षाच्या पाठीशी आम्ही सगळे राहू.- अतुल सावे, ओबीसी कल्याणमंत्री

महापौर आमचाच होईलशहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नासह चांगल्या सुविधा देण्यासाठी चांगले नगरसेवक निवडून आणण्यासाठी संघटन बांधणी करण्याचा प्रयत्न असेल. पालिका निवडणुकीत भाजपचाच महापौर बसेल. त्यासाठी सर्वांना सोबत घेऊन चालू.- किशोर शितोळे, भाजप शहराध्यक्ष.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरBJPभाजपाShiv Senaशिवसेना