शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

‘सर, सर’ म्हणणाऱ्या न्यायमूर्तींवर आमचा विश्वास नाही : छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 07:22 IST

आपल्याच सरकारवर मंत्र्यांची टीका; मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या

छत्रपती संभाजीनगर :  मराठा आरक्षणासंदर्भात सरकारच्या समितीतील दोन माजी न्यायमूर्ती मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाऊन त्यांना ‘सर सर’ म्हणत असतील, तर त्यांच्यावर आमचा विश्वास नाही, असे म्हणत अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला. बीड व माजलगाव येथे अलीकडेच झालेल्या जाळपोळीची  पाहणी केल्यानंतर ते येथे पत्रकारांशी बोलत होते.  

माजी न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड, न्या. सुनील सुक्रे यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे यांची भेट घेतली होती. त्यांच्याशी चर्चेनंतरच जरांगेंनी उपोषण मागे घेतले. भुजबळ यांनी यावरच आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, ‘जरांगे यांच्या उपोषणावेळी लाठीचार्ज झाला. त्यात ७० पोलिस जखमी झाले, त्यांची बाजू पुढे आली नाही. आमच्या सरकारने त्यांच्या बदल्या केल्या. पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हावी.

...आता तर दहशत माजवावीच लागेल!मराठा आरक्षणाच्या विरोधात आपण नाही, पण त्यांना ओबीसींमधून आरक्षण नको, ही भूमिका सर्वच पक्षांची आहे. ज्यांची नोंद अगोदर असेल, त्यांना प्रमाणपत्र देण्यास हरकत नाही. 

सरसकट प्रमाणपत्र देत असाल तर हा मागच्या दरवाजाने येण्याचा प्रकार आहे. अन्याय होत असेल तर आपल्याला कोणीही औषध देणार नाही. आता दहशत माजवावीच लागेल, असे वक्तव्य भुजबळ यांनी वडीगोद्री (जि. जालना) येथे केले. मात्र आपण ‘दहशत’ असा शब्दोच्चार केला नसल्याचा खुलासाही त्यांनी नंतर केला.

रामराम केला तर काय बिघडले? : जरांगे  जे न्यायमूर्ती आमचा जीव वाचवायला आले त्यांच्याबद्दल मंत्रिपदावरील व्यक्तीने इतक्या खालच्या पातळीवर बोलणे हे षडयंत्र आहे. नमस्कार करण्याची आपली संस्कृती आहे. त्यांनी रामराम केल्यास काय बिघडले, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले.  अंतरवाली सराटी येथे पोलिसांनी केलेल्या हल्ल्याचा कट कोणी घडवून आणला, याची चौकशी करावी. या घटनेचे ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊ द्या, असे आवाहनही त्यांनी केले. ‘तुम्ही मंत्री आहात तर मग जातनिहाय जनगणना करा, तुम्हाला कोणी रोखले’ असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील