शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'आम्ही शिवसेनेसोबत'; क्रांतीचौकात शिवसैनिकांचे बंडखोरांच्या विरोधात निदर्शने

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 14:53 IST

क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शने केली

औरंगाबाद: शिवसेनेत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने संपूर्ण राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. विशेष म्हणजे, या बंडात सेनेचा बालेकिल्ला असलेल्या औरंगाबादने मोठी रसद दिल्याचे समोर आल्याने स्थानिक नेतृत्वावर मोठी नामुष्की ओढवली आहे. या सर्व परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या शिवसैनिकांनी आज सकाळी क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात निदर्शने केली. 

शिवसेनेचे मातब्बर मंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांनी बंड केल्यानंतर त्याचे पडसाद म्हणून जिल्ह्यातील आमदारांच्या घरावर संतप्त शिवसैनिक हल्ला करतात की काय, अशी शक्यता होती. मंगळवारी रोहयो मंत्री संदीपान भूमरे यांचे घर आणि कार्यालयावर पोलीस बंदोबस्त होता; तर आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यालयांवर भयाण शांतता होती. दरम्यान, वेट ॲण्ड वॉच अशी भूमिका घेत सर्वांनी मंगळवारचा दिवस शांततेत घालविला.

पहिल्यांदाच बंडखोरीनंतर शिवसैनिक सायलेंट मोडवर पाहायला मिळाले. मात्र, आज सकाळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली क्रांती चौकात बंडखोरांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे, यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सर्वाधिक घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, प्रतिभा जगताप, सुनिता देव, लता पगारे, सर्व महिला पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.  

बालेकिल्ल्यातील बंडखोरीची ही असू शकतात कारणे...ज्येष्ठ शिवसैनिकांनी सांगितले की, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रमात स्थानिक आमदारांना अजिबात महत्त्व दिले गेले नाही. जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनीच सर्व कार्यक्रमावर अधिराज्य गाजवले. आणखी एक उदाहरण द्यायचे झाल्यास ८ जून रोजी सांस्कृतिक मंडळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली होती. या सभेतही दानवे यांनी माईकचा ताबा सोडला नाही. त्यामुळेही सेना आमदारांची नाराजी बरीच वाढली होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAmbadas Danweyअंबादास दानवेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ