शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच’

By admin | Updated: January 6, 2015 01:12 IST

औरंगाबाद : आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच असून, स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले

औरंगाबाद : आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच असून, स्वतंत्र मराठवाडा राज्य व्हावे असे आम्हाला वाटत नाही, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज येथे सांगितले. मराठवाड्यावर अन्याय होता कामा नये. मराठवाड्याला न्याय मिळालाच पाहिजे, मराठवाड्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, असा आग्रह मात्र त्यांनी धरला. तसेच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला; पण मुस्लिम आरक्षण वगळल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचा जाहीर निषेधही केला. सरकार जातीयवाद करीत असून हे सारे मतांचे राजकारण असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.आयआयएमला नागपूरला पळवले, जायकवाडीला समन्यायी पद्धतीने पाणी सोडले जात नाही, रेल्वेचे प्रश्न सुटत नाहीत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, अशावेळी स्वतंत्र मराठवाड्याची मागणी पुढे येत आहे. आपले मत काय असे विचारता अशोक चव्हाण उत्तरले की, आम्ही एकसंध महाराष्ट्रवादीच आहोत. मात्र, मराठवाड्याला न्याय मिळाला पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आली वगैरे असे काही म्हणता येत नाही. पक्ष सोडून कुणी जात नाही. प्रश्न रेटून न्यावे लागतील. यासाठी पक्षातर्फे बैठका, मेळावे या माध्यमातून जनजागृती सुरूआहे.काँग्रेसचा कार्यक्रम म्हटल्यानंतर नेहमीच नियोजनाचा अभाव बघावयास मिळतो. कोण काय बोलेल, याचा नेम नसतो. आजही सुरेश जेथलिया यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा मुद्दा काढला. विधानसभा निवडणुकांमधील पराभवाचे चिंतन करा.. फार थोड्या मतांनी अनेकजण पडले आहेत, असे उद्गार काढून व दुष्काळाबद्दल फारसे न बोलता ते थांबले. गेव्ह आवारी समिती तक्रारींची छाननी करीत आहे, असे माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी वार्तालाप करताना अब्दुल सत्तार यांचे खटकणारे मध्ये मध्ये बोलणे चालूच होते. देवेंद्र फडणवीस सरकार आता आले. त्याआधी पृथ्वीराज चव्हाण यांचे सरकार होते. मग त्यांनी दुष्काळाबद्दल व आयआयएमबद्दल काय केले या प्रश्नाचे उत्तर देताना दोन्ही नेते एकमेकांकडे पाहायला लागले. आयआयएमबद्दल पृथ्वीराज चव्हाण सरकारने निर्णय घेतला होता, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. ४आयआयएमबद्दलचा निर्णय केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने घ्यावयाचा आहे. राज्य सरकारच्या शिफारशींची गरज नाही. अजूनही केंद्र सरकार मनात आणेल, तर औरंगाबादला आयआयएम स्थापन करण्याचा निर्णय घेऊ शकते, असे चव्हाण यांचे म्हणणे पडले.