‘जलवाहिनी’अडकली वादाच्या भोवऱ्यात...!

By Admin | Updated: May 18, 2017 00:31 IST2017-05-18T00:30:05+5:302017-05-18T00:31:08+5:30

जालना: शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम आपल्याच प्रभागात व्हावे म्हणून नगरसेवकांत स्पर्धा सुरू आहे.

'Waterfall' is in the vicinity of the promise ...! | ‘जलवाहिनी’अडकली वादाच्या भोवऱ्यात...!

‘जलवाहिनी’अडकली वादाच्या भोवऱ्यात...!

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: शहरातील अंतर्गत जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम आपल्याच प्रभागात व्हावे म्हणून नगरसेवकांत स्पर्धा सुरू आहे. परिणामी कुठल्याही एका भागात काम पूर्ण होत नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील वॉर्ड अंतर्गत कामे मंजूर झाल्याने नगरसेवकांनी जलवाहिनी कामाची कामासाठी हट्ट धरल्याचे सांगण्यात येते.
निजामकालीन अंतर्गत जलवाहिनी बदलून त्याजागी नवीन जलवाहिनी अंथरण्यात येत आहे. सुमारे साडेचारशे किमी जलवाहिनीचे काम होणार असून, त्यापैकी ५० ते ६० कि.मी.चे काम पूर्ण झाल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात येते. प्रत्यक्षात या कामासाठी अनेक नगरसेवकांत काम आपल्याच प्रभागात व्हावे म्हणून ओढताण होत आहे.
यामुळे कंत्राटदार तसेच जलवाहिनी अंथरणाऱ्या कर्मचाऱ्यांत संभ्रम होत आहे. नगरोत्थान अंतर्गत शहरातील १५ विविध वॉर्ड अंतर्गत सिमेंट तसेच डांबरी रस्ते तयार करण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांत हे कामे सुरू होणार आहेत. मात्र जलवाहिनीचे काम अगोदर झाल्यास रस्ते कामाचा मार्ग मोकळा होईल म्हणून काही नगरसेवकांनी ही कामे या प्रभागात अधी करावी म्हणून जोर लावला आहे.
१२७ कोटींची ही योजना राबविण्यात येत असून, नुकतेच या जलवाहिनी कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नगरसेवक सक्रिय झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी गल्ली बोळातील रस्ते व डांबरीकरणाच्या कामाचे कंत्राट नगरसेवकांनी घेतले आहेत. जलवाहिनीचा अडसर असल्यामुळे ही कामे करण्यास नगरसवेकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जलवाहिनी अंथरण्यासाठी नगरसेवकांचा पाठपुरावा सुरू आहे. आझाद मैदान, पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, इंदेवाडी, चंदनझिरा, सदर बाजार, सकलेचा नगर, रामनगर, नागेवाडी, एसआरपीएफ, मार्केट यार्ड, किल्ला झोन, सिद्धीविनायक नगर, सामनगाव, अहमद उर्दू स्कूल, शब्बीर अली चौक, नूतन वसाहत, पाणीवेस हे शहरातंर्गत झोन आहेत. पैकी कलेक्टर आॅफीस झोनमधील काम अंतिम टप्प्यात आहेत. हे ५० किमी झाल्याचे पाणीपुरवठा अभियंत्यांनी सांगितले. अंतर्गत जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, मंगळवारी उर्वरित पाईप जालना शहरात आले.

Web Title: 'Waterfall' is in the vicinity of the promise ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.