‘सुनेच्या राशीला सासू’ तून वाहणार हास्याचा धबधबा
By Admin | Updated: December 28, 2015 23:21 IST2015-12-28T23:01:56+5:302015-12-28T23:21:01+5:30
जालना : लोकमत सखीमंचतर्फे आयोजित धम्माल विनोदी नाटक सुनेच्या राशीला सासू तून सखीमंचच्या सदस्यांना मिळणार खळखळून हसण्याची संधी.

‘सुनेच्या राशीला सासू’ तून वाहणार हास्याचा धबधबा
जालना : लोकमत सखीमंचतर्फे आयोजित धम्माल विनोदी नाटक सुनेच्या राशीला सासू तून सखीमंचच्या सदस्यांना मिळणार खळखळून हसण्याची संधी. या नाटकाचे आयोजन ३१ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात आले आहे.
२०१५ च्या सरत्या वर्षाला निरोप देताना खळखळून हसविणारे धम्माल त्रिपात्री नाटक सखीमंचच्या सदस्यांना भेटीस येणार आहे.
या नाटकात सासू सुनेच्या नात्याची भन्नाट विनोदी मांडणी करण्यात आली आहे. या नाटकातून योगिणी पोफळे, मनोहर सोनन आणि सिनेस्टार नयना आपटें सारखे कलाकार सखी मंचच्या सदस्यांना भेटण्यास येत आहे. भन्नाट विनोदी कथानकाचा आधार असणारं हे नाटकं सखीमंचच्या सदस्यांना पूर्णवेळ हसवत ठेवणार आहे.
सखीमंचच्या सदस्यांनी या नाटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले असून, या नाटकाच्या प्रवेशिका लोकमत कार्यालय, भोकरदन नाका येथे उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य. या तत्वावर या प्रवेशिका वाटण्यात येत असून, आपली प्रवेशिका निश्चित करावी. (प्रतिनिधी)