जकापूर प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा !
By Admin | Updated: August 11, 2014 01:53 IST2014-08-11T00:57:55+5:302014-08-11T01:53:24+5:30
गुंजोटी : सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले आहेत. याला जकापूर प्रकल्पही अपवाद नाही. या प्रकल्पात आज घडीला ३०

जकापूर प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा !
गुंजोटी : सध्या पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले आहेत. याला जकापूर प्रकल्पही अपवाद नाही. या प्रकल्पात आज घडीला ३० टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असतानाही शेतीसाठी पाणी उपसा सुरु आहे. या प्रकाराकडे संबंधित प्रशासनाकडून पद्धतशीरपणे डोळेझाक केली जात आहे.
गुंजोटी परिसरामध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला असला तरी प्रकल्पाची पाणी पातळी वाढेल असा एकही दमदार पाऊस पडलेला नाही. जकापूर येथील प्रकल्पात आजघडीला ३० टक्केच्या आसपास पाणीसाठा आहे. असे असले तरी गुंजोटी गावाला मात्र आजही पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पळसगाव साठवण तलाव क्षेत्रात विहीर खोदून पाणी योजना राबविली. परंतु सध्या विहिरीमध्येच पाणी नसल्याने ही योजनाच कुचकामी ठरणार आहे.
असे असतानाच दुसरीकडे संबंधित प्रकल्पातून शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे. गुंजोटी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतीसाठी पाणी उचलण्यास मनाई केली आहे. असे असले तरी काही शेतकरी रात्रीच्या वेळी पाणी उपसा करीत आहेत. यासंदर्भात ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी संबंधिात विभाागाचे अधिकारी इकडे फिरकत नाहीत. त्यामुळे अवैधरित्या पाणी उपशाला पायबंद बसू शकला नाही. (वार्ताहर)