२ रुपयांना पाण्याची घागर

By Admin | Updated: April 9, 2017 23:25 IST2017-04-09T23:22:34+5:302017-04-09T23:25:21+5:30

किल्लारीमाकणीच्या निम्नतेरणा प्रकल्पातून असलेल्या ३० खेडी योजनेंतर्गत किल्लारीला पाणीपुरवठा केला जातो़

Water worth 2 rupees | २ रुपयांना पाण्याची घागर

२ रुपयांना पाण्याची घागर

सूर्यकांत बाळापुरे किल्लारी
माकणीच्या निम्नतेरणा प्रकल्पातून असलेल्या ३० खेडी योजनेंतर्गत किल्लारीला पाणीपुरवठा केला जातो़ प्रकल्पात मुबलक पाणीसाठा असताना ४ महिन्यांपासून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाणीपुरवठा बंद पडला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
निम्न तेरणा प्रकल्पात मागील काही वर्षांपासून सतत आवर्षण असल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत नव्हता़ गतवर्षी येथील प्रकल्पाचे पाणी लातूर शहराला देण्यात आले होते़ ग्रामस्थांना उशाला पाणी असूनसुध्दा पाणी मिळेना झाले आहे़ महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केल्याने ३० खेडी योजना बंद पडली आहे़ गावात पाण्याचे इतर स्त्रोत नसल्याने ग्रामस्थांना विकतचे पाणी घेवून तहान भागवावी लागत आहे़ पाण्याचा धंदा गावात तेजीत आहे़ ५०० लिटरचा टँक १०० ते १५० रूपयांना मिळत आहे़ २ रूपयांत घागरभर पाणी विक्री सुरू आहे़ सर्वसामान्य कुटुंबाची यात मोठी हेळसांड होत आहे़ जिल्हा परिषद सदस्य सुभाष पवारयांनी दोन टँकरच्या माध्यमातून गावात पाणीपुरवठा सुरू केला आहे़
गावात चार महिन्यांपासून टंचाई असताना लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला नाहीत़ भारत निर्माण योजनेंतर्गत ८० लाखांचा वाया गेल्याची चर्चा
आहे़

Web Title: Water worth 2 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.