बारा गावांमधील पाणी दूषित
By Admin | Updated: July 8, 2014 00:37 IST2014-07-07T23:52:21+5:302014-07-08T00:37:00+5:30
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांचे पाणी नमुने तपासणी झाली असता १२ गावांमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे.

बारा गावांमधील पाणी दूषित
नर्सी नामदेव: हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ३३ गावांचे पाणी नमुने तपासणी झाली असता १२ गावांमधील पाणी दूषित असल्याचे निदर्शनास आले आहे.
नर्सी केंद्रातील केसापूर, घोटा, सवड, कडती, हनवतखेडा, सरकळी, वैैजापूर, लिंबाळा, काळकोंडी, अंधारवाडी, चिखलवाडी, जांभरुण आंध या गावातील काही हातपंप, सार्वजनिक विहीर या ठिकाणचे पाणी नमुने नुकतेच तपासणी करण्यासाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यात १२ गावांमध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे कळाले.
केंद्र कार्यवाहीस तयार
नर्सी केंद्रातील १२ गावातील पाणी दुषित असल्याने आरोग्य पथकाने त्या गावात जावून ग्रामपंचायतीला लेखी पत्र दिले. तसेच नियमित पाणीपुरवठा करताना त्याचे त्याचे शुद्धीकरण कसे करावे? याचीही माहिती दिली. तसेच ब्लिचिंग पावडरचा वापरही योग्य प्रमाणात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
पावसाळ्याच्या तोंडावर झालेली ही पाणी तपासणी गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. सदर ग्रामपंचायतींनी हयगयी केल्यास त्याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सहाय्यक एस. पी. दहातोंडे यांनी दिली. (वार्ताहर)