पाण्यासाठी मनपाकडून चाचपणी !
By Admin | Updated: November 25, 2014 00:57 IST2014-11-25T00:34:55+5:302014-11-25T00:57:53+5:30
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे़

पाण्यासाठी मनपाकडून चाचपणी !
लातूर : लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा असल्याने मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे़ पावसाळ्यातही पाणीटंचाईचे चटके सहन करणाऱ्या लातूरकरांना उन्हाळ्यात तीव्र टंचाईचा सामोरे जावे लागणार आहे़ टंचाई कमी करण्यासाठी मनपा प्रशासन पाणीसाठ्यांची चाचपणी करीत आहे़ सोमवारी माजी मंत्री आ़ अमित देशमुख यांच्यासह मनपा पदाधिकाऱ्यांनी लिंबोटी धरणाची पाहणी केली आहे़ भविष्यात लातूरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी लिंबोटी किंवा उजनी येथून पाणी मिळू शकेल काय, याची चाचपणी केली जात आहे़
पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा मांजरा प्रकल्पात शिल्लक नसल्याने पर्यायी मार्गाचा शोध घेतला जात आहे़ मांजरा नदीवर असलेल्या बॅरेजसचे पाणी शहरासाठी राखीव ठेवण्यात आले आहे़ एकंदरीत शहराची गरज लक्षात घेता पाणीटंचाई वाढणार हे लक्षात आल्यामुळे मनपा प्रशासन कामाला लागले आहे़ लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील मन्याड प्रकल्पातून कायमस्वरूपी पाणी योजना करण्यासाठी मनपाने ३५० कोटींचा आराखडा तयार केला आहे़ मात्र, सदरील प्रकल्पातून लातूरला पाणी आणता येईल की नाही, याबाबत निश्चितता नसल्याने उजनीच्या पर्यायावरही विचार केला जात आहे़ समुद्र सपाटीपासून लातूर शहर ६२४ मीटर उंच तर उर्ध्व मन्याड प्रकल्प ४३० मीटर उंचीवर आहे़ या प्रकल्पातून किती पाणी लातूरला मिळू शकते यावर चाचपणी केली जात आहे़ सोमवारी माजी मंत्री अमित देशमुख, महापौर अख्तर मिस्त्री, उपमहापौर कैलास कांबळे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष ज्योती पवार, शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, मनपा आयुक्त सुधाकर तेलंग, गटनेते नरेंद्र अग्रवाल, रिपाइचे गटनेते चंद्रकांत चिकटे, अॅड़ दीपक सूळ, असगर पटेल, रविशंकर जाधव, राजेंद्र इंद्राळे, नवनाथ आल्टे, रवी सुडे, विष्णूपंत साठे, अहेमदखाँ पठाण यांच्यासह गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)४
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात गेल्या तीन वर्षांपासून पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे पाणीसाठा अत्यल्प आहे़ शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी पुरक पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहे़ त्यामुळे लिंबोटी व उजनी येथून पाणी आणण्याचा प्रयत्न आहे़ महानगरपालिका, राज्य शासन व केंद्र शासनाच्या माध्यमातून पुर्णत्वास आणण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती माजी मंत्री आ़ अमित देशमुख यांनी यांनी प्रकल्प पाणीनंतर अहमदपूर येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली़ यावेळी महापौर अख्तर शेख, आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पाणीपुरवठा योजनेसंदर्भात माहिती दिली़ ४
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने लातूर शहराचा पाणीपुरवठा महानगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यामुळे आता पाणीपुरवठा मनपालाच करावा लागणार आहे़ त्यासाठी जलवाहिन्याची दुरूस्ती, आवश्यक तिथे जलवाहिनीचे नवे जाळे, पाणी गळती, वितरण व्यवस्था सक्षम करावी लागणार आहे़ अद्याप सदरील योजना एमजीपीकडे असली लवकरत तिचे हस्तांतरण होणार आहे़