शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

५६ बंगल्यांना नळपट्टी; परंतु नळाला पाण्याचा थेंब नाही

By साहेबराव हिवराळे | Updated: November 13, 2023 17:04 IST

एक दिवस एक वसाहत; तोरणागडनगरात पावसाळ्यात सरपटणारे प्राणी अंगणात, जॉगिंग पार्कमध्ये साहित्याचे सांगाडे

छत्रपती संभाजीनगर : एन-२ तोरणागडनगर येथील नागरिकांना विविध नागरी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ५६ प्रशस्त घरधारकांना नळपट्टी भरूनही पाण्याचा एक थेंबही मिळत नाही.

पावसाळ्यात सरपटणारे प्राणी अंगणात दिसतात तर जॉगिंग पार्कमध्ये व्यायामासाठी असलेल्या साहित्याचे सांगाडे शिल्लक राहिले आहेत. जालना रोड तसेच चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्ता छान झाला असल्याने भरधाव वाहनांमुळे रोज किरकोळ अपघात होत आहेत. येथे शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच डॉक्टर, वकील, अभियंता, आयटी क्षेत्रात तसेच काॅर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे तसेच उद्योजक, महसूल, पोलिस कर्मचारीदेखील वास्तव्यास आहेत. या भागात असलेल्या जलवाहिनीचे पाणी कमी दाबाने येत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. नाईलाजास्तव पाण्याचे टँकरही मागवावे लागत आहेत.

दखल घेतली नाही तर आंदोलनतोरणागडनगरातील प्रश्नाकडे सातत्याने लक्ष द्या, असे मनपाला तसेच सिडकोला कळवूनही दुर्लक्ष केले जात आहे. पाणी, ड्रेनेजसह विजेच्या प्रश्नांची सोडवणूक करा, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.- भरत दाभाडे

पोलिसांची गस्त हवीभाजी मंडईचे गाळे सिडकोने वाटप केले; परंतु, त्या गाळ्यात एकही भाजी विक्रेता बसत नाही, त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून किंवा मुकुंदवाडीतून भाजीपाला विकत आणावा लागतो. रात्री रस्त्यावर काही जणांचा गोंधळ सुरू असतो. अंधारात लूटमारीचे प्रकार होण्याची भीती आहे. पोलिसांची गस्त आवश्यक आहे.- शैलजा कुलकर्णी

जलकुंभाच्या कामाचे काय?पिण्याचे पाणी कमी दाबाने येते. बहुतांश नागरिकांना पाणीपुरवठाच केला जात नाही. जलकुंभाचे काम लवकर होईल अन् पाणी मिळेल, अशी आशा नागरिक बाळगून आहेत.- अनिता शहाणे

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी