२४ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
By Admin | Updated: July 21, 2014 00:23 IST2014-07-20T23:41:30+5:302014-07-21T00:23:45+5:30
वाशी : यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोतातील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे़

२४ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा
वाशी : यंदा पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोतातील पाणीपातळीत मोठी घट झाली आहे़ शहरासह ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे़ तालुक्यातील २४ गावांना जलस्त्रोत अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़
तालुक्यातील बनगरवाडी, विजोरा, घाटपिंपरी, पारगाव, जानकापूर, पिंपळगावलिंंगी, दहिफ ळ व खानापूर या गावाना टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे़ सोनेगाव, सारोळा - वाशी, बनगरवाडी, विजोरा, कवडेवाडी, लाखनगाव, इंदापूर, दहिफळ, जेबा इ. ठिकाणी अधिग्रहण करण्यात आले आहे़ वाशी शहरासह केळेवाडी, कन्हेरी, पारडी या गावांना भूम तालुक्यातील वंजारवाडी प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ या प्रकल्पात सध्या बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. इंदापूर, तेरखेडा व नांदगाव या गावांना नांदगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होत आहे. या प्रकल्पात मुबलक साठा आहे. वंजारवाडी प्रकल्पातील पाणी कमी झाले तर नांदगाव प्रकल्पातील पाणी वंजारवाडी प्रकल्पात सोडल्यास वाशी व भूम तालुक्याची तहान भागेल एवढे पाणी दोन्ही प्रकल्पात आहे़
उत्पन्न वीजबिलात
वाशी शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या वंजारवाडी प्रकल्पातून करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे़ त्यामुळे ग्रामपंचायत जे उत्पन्न मिळते ते सर्व वीज बिल भरण्यासाठीच खर्च होत आहे. महिन्याकाठी लाईटबिलाचा भरणा केला नाही तर लगेचच वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते.